दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी संतोष मंनधरणे
जागतिक महिला दिनानिमित्त युवा सेनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसह आरोग्य सेवेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्करांचा रविवारी (दि. ८ मार्च) येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व्यंकटराव पाटील खतगावकर, युवा सेना तालुकाप्रमुख नामदेव पाटील देगावकर, अँड. अंकुशराजे जाधव, डॉ. मिलिंद शिकारे, मनोहर देगावकर ,आनंद राजुरे, बजरंग कोसंबे ,सुनील शिंदे, सुनील थडके, मिलिंद काळगावकर , प्रकाश पाटील वसुर, अंकुश पाटील, शिवकुमार शिवपुजे, संतोष वाघमारे यांची उपस्थिती होती.
शहरातील १२ वार्डमधील एकूण २६ आशा वर्कर तसेच शासकीय रुग्णालयातील सिस्टर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निरूपमा ताई असपतवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी व्यंकटराव पाटील खतगावकर, डॉ. दीक्षित मॅडम व डॉ. मिलिंद शिकारे यांनी मनोगत व्यक्त करत आरोग्य क्षेत्रात महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. तसेच राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व माता रमाई आंबेडकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महिलांना सन्मान देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजक तथा युवा सेना तालुकाप्रमुख नामदेव पाटील देगावकर यांनी सांगितले आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अंकुशराजे जाधव यांनी केले. तर आभार मिलिंद काळगावकर यांनी मानले
