गडचिरोली -/२०/-विजय शेडमाके.
गडचिरोली:-गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ आता जवळजवळ संपुष्टात आली असून, कधीकाळी १० उपविभागामध्ये सक्रिय असणारी माओवादी हालचाल आता फक्त भामरागड उपविभागाच्या सीमा वरती भागात सीमित राहिली आहे. काल दिनांक १९ मार्च २०२६ रोजी ११ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या प्रमुख माओवादी मध्ये सोनी उर्फ बाली वक्ते मट्टामि(डीव्हीसीएम) बुधरी उर्फ रामबत्ती आईतु मट्टामि (एशिया कमिटी सचिव) सुखलाल बोरगाव कोकसा (कमांडर) शांती उर्फ सोमरी गंगा तेलामी (पीपीसीएम) यमुना का उर्फ रुक्मक्का कोटी पेंदाम (एसीएम) यांच्या समावेश आहे. याशिवाय इतर सहा सदस्यांनी देखील आत्मसमर्पण केले.
संपूर्ण आकडेवारी..
सन२०२५ पासून आतापर्यंत १२३ मावौवाद्यांनी आत्मसमोर पण केले.
सन २००५ पासून एकूण ७९४ माओवादींनी गडचिरोली पोलीस समोर आत्मसमर्पण केले आहे.
कालच्या आत्मसमर्पणामुळे गडचिरोलीतील माओवादी हालचालीवर मोठा धक्का बसला आहे.
आत्म समृद्धीत माओवादी शासनाचे बक्षीस..
सोनी व बुद्धी यांच्यावर प्रत्येकी १६ लाख रुपये, सुकलाल व शांती यांच्यावर प्रत्येकी ८ लाख रुपये, यमुनका ६ लाख रुपये, इतरांवर २ते५ लाख रुपये बक्षीस जाहीर केले गेले. पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अतिरिक्त मदत मिळणार आहे. त्यात जोडप्यांनी एकत्र आत्मसंर्पण केल्यास अतिरिक्त लाभ १.५ लाख रुपये आणि गटाने आत्मसमर्पण केल्यास १० लाख रुपयाची मदत मिळणार आहे.
पोलिसांचे आव्हान-
विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षल विरोधी अभियान) संदीप पाटील यांनी उर्वरित माओवादींना हिंसा सोडून लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.
उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उप- महानिरीक्षक अंकित गोयल, उप महानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक निलोत्पल, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समावेश होता. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी मोहिमेमुळे आणि शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे जिल्ह्यात माओवादी चळवळ जवळ जवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
