दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी
लोणावळा परिसरातील ग्रामीण कवी श्रीराम यांनी यंदा एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. पारंपरिक गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या घरी “साहित्याची गुडी” उभारून वाचनसंस्कृतीचा संदेश दिला.
“शब्द पंढरीचे आम्ही आहोत वारकरी, साहित्याची गुडी उभारली माझ्या घरी” या ओळींतून त्यांनी आपल्या भावनांना सुंदर शब्दांत व्यक्त केले. या उपक्रमातून पुस्तकांप्रती प्रेम, ज्ञानाची उपासना आणि मराठी साहित्याची जपणूक करण्याचा संदेश त्यांनी समाजाला दिला.
साहित्याची गुडी म्हणजे केवळ सजावट नसून ती ज्ञान, संस्कार आणि विचारांची उंच पताका असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत असून, तरुण पिढीने वाचनाची आवड जोपासावी, असा संदेशही त्यांनी दिला.
ग्रामीण भागात अशा प्रकारचे उपक्रम राबवले गेल्यास वाचनसंस्कृती अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
