बारामती पोट निवडणुकीतून माघार !
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीमधील पोट निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी घोषणा केली होती. मात्र आज अर्ज भरण्याच्या दिवशी लक्ष्मण हाके यांनी आपली तलवार म्यान केली असून त्यांनी बारामती पोटी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं.
याबाबत दत्तात्रय भरणे यांनी मध्यस्थी केली.
माघारीबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, सहानभूतीची लाट असतानाही मी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. मी ओबीसी नेता आहे मी या निवडणुकीच्या माध्यमातून काही मुद्दे आक्रमकपद्धतीनं मांडणार होतो. मला राज्यातील वरिष्ठांचे कॉल आले. ज्यावेळी सुनेत्रा वहिनींचा कॉल आला त्यावेळी मी माघार घेतली. मी या निवडणुकीनंतर थांबणार नाही. मी माझे प्रश्न सुनेत्रा पवार, फडणवीस आणि शिंदे यांच्याकडे मांडणार आहे.
