राज्याला मिळाला भाजपचा पहिला मुख्यमंत्री…
बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडत असून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे राज्याचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गावर आहेत. जनता दल (युनायटेड) चे प्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हा राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे.
सम्राट चौधरी यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेत्यपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या नावाचा अधिकृत प्रस्ताव लवकरच लोक भवन येथे सादर केला जाणार आहे. पक्षांतर्गत चर्चेनंतर त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
भाजपच्या उच्चस्तरीय सूत्रांच्या माहितीनुसार सम्राट चौधरी हे बुधवारी 15 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीमुळे बिहारमध्ये भाजपचा पहिल्यांदाच मुख्यमंत्री होणार असून राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार आहे.
