
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी
भरत पवार
पांगरी :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती निमित्त गावातील नागरीक, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच ,नगरसेवक पंचशील कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच यांच्या हस्ते श्रीफळ फोडून, ध्वजारोहण करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात झाली. जमलेल्या सर्व नागरिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी उपस्थित बबन निर्मले (नगरसेवक) ,युवराज वाघमारे(मा.नगरसेवक),हरिभाऊ शेटे,सतीश आनेराव, माधव खुशालराव पाटील(उपसरपंच),शिवाजी आणाराव, मारोती भगवानराव बुद्रुक(तंटामुक्ती अध्यक्ष),भरत विठ्ठलराव पवार(शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पांगरी),वसंत किशनराव यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, भगवान हांकारे यांनी केले.नामदेव हांकारे (अध्यक्ष),आशोक गायकवाड(उपअध्यक्ष), राजू पिराजी गायकवाड ,लक्ष्मण गायकवाड व गोविंद गायकवाड यांच्या वतीने भीम जयंतीचे आयोजन करण्यात आले होते