
दैनिक चालु वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी
शहाबाज मुजावर
कोल्हापूर :- लोक राजा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व या अंतर्गत शहरात राजश्री शाहू प्रदक्षिणा आयोजन केले आहे.ही प्रदक्षिणा रविवारी दिनांक.१/५/२०२२ सकाळी सात ते आठ या कालावधीत होणार आहे .यात सहभागी होणाऱ्यांनी सकाळी साडे सहाला,शाहू मिल समोर एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.हा मार्ग शाहू मिल इथून सुरू होऊन,टेंबे रोड,खासबाग ,शाहू वैद्यकीय स्कूल, बिंदू चौक, शाहू चित्रपटगृह,दसरा चौक,शाहू स्मारक, नर्सरी बागेतील शाहू समाधी,दसरा चौक,व्हीनस कॉर्नर, गोकुळ हॉटेल,शाहूपुरी,व्यापार पेठ,बी.टी.महाविद्यालय,बागल चौक, असा प्रदर्शनाचा मार्ग आहे.सहभागी होणाऱ्यांनी पांढरा शर्ट पांढरा कुडता,पांढरी साडी,सलवार-कमीज,या पैकी कोणती वस्त्र परिधान करून यात सहभागी व्हायचे आहे,असे सुधर्म वाझे यांनी दैनिक चालू वार्ता ला माहिती दिली. जे सहभागी होणार आहेत त्यांनी या नंबर वर संपर्क साधावा. 8329681766 आयोजक म्हणून रवी गवळी ,राजू नांद्रे,मीनाक्षी नलवडे ,काम पाहत आहेत.