
लोहा तहसील कार्यालयात आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण.
लोहा न.पा.त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण.
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
लोहा शहरात दि.१ मे महाराष्ट्र दिन विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी लोहा तहसिल कार्यालयात मुख्य ध्वजारोहण नांदेड दक्षिण चे कार्यसम्राट आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी आमदार रोहिदास चव्हाण, नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, तहसीलदार व्यंकटेश मुंढे,नायब तहसीलदार अशोक मोकले,बीडओ व्हावळे, माजी सभापती आनंदराव पाटील शिंदे, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी जि.प. व पं.स. सदस्य श्रीनिवास मोरे, उद्योजक भीमाशंकर मामा कापसे, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, लोहा न.पा.चे गटनेते नगरसेवक करीम शेख, जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे, पत्रकार विलास सावळे, विनोद महाबळे, तालुका कृषी अधिकारी अरुण घुमनवाड, पेशकार गणेश मोहिजे, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, दत्ता पाटील दिघे,सीडीपीओ चटलावार, यांच्या सहित कार्यालयीन कर्मचारी शहरातील व तालुक्यातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
यानंतर शहिद जवान बोडके व शहिद जवान संगेवार यांच्या माताचा सत्कार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच त्यानंतर लोहा एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा लोहा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीतील दोन महिला मदतनीस यांचा कोरोना काळात मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या वारसास प्रत्येकी ५० लक्ष रुपयांचा धनादेश आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते देण्यात आला.
यात एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालय अंतर्गत चंद्रकला धोंडीबा देवकांबळे ( मदतनीस) अंगणवाडी केंद्र लोंढेसांगवी ता. लोहा यांचा कोरोना काळात मृत्यू झाला होता तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोविड १९ विमा सानुग्रह अनुदान ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले ते त्यांचे वारसदार धोंडीबा मुंजाजी देवकांबळे (पती) रा.लोंढेसांगवी यांना ५० लक्ष रुपयांचा धनादेश आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते वितरीत आला.
तसेच दुसरी मदतीस कलावतीबाई दौलतराव लांडगे (मदतनीस) रा. लांडगेवाडी ता.लोहा यांचे ही कोरोना काळात निधन झाल्यामुळे त्यांच्याही वारसांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोविड १९ विमा सानुग्रह अनुदान ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले व त्यांचे वारसदार मन्मथ दौलतराव लांडगे (मुलगा) रा. लांडगेवाडी यांना ही ५० लक्ष रुपयांचा धनादेश आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. तसेच यावेळी आमदार मोहन अण्णा हंबर्डे व माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्व जनतेस शुभेच्छा दिल्या.
तसेच लोहा न.पा. कार्यालयात ही दि.१ हे महाराष्ट्र राज्याचा ६२ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, यांच्यासहित सर्व नगरसेवक कार्यालयीन कर्मचारी लोहा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय लोहा येथे दि. १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपविभागीय अभियंता मोहन पाटील पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
यावेळी शाखा अभियंता गाडगे,मामडे,महाबळे, स्वप्नील, संदीप, यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच लोहा शहर तालुक्यातील सर्व शासकीय- निमशासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी दि. १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.