
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी-सविता पोळके
वाळूज येथील बॅक ऑफ बडोदा शाखेच्या शाखा व्यवस्थापक ज्योती पासवान यांचा पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांच्याकडून महाराष्ट्र दिनानिमित्त चांगली कामगिरी बजावली म्हणून विशेष गौरव सन्मान पुरस्काराने लासूर स्टेशन येथील लक्ष्मीनारायण लाॅन्स येथे सन्मान करण्यात आला आहे.यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले, पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक वरकड, सरपंच विजयसिंह मोरे, ग्रामसेवक अर्चना सावंत, लासूर स्टेशन येथील सरपंच मीनाताई पांडव, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम,सुरेश गव्हाणे,मजणू पठाण,टायगर ग्रुपच्या कविता चव्हाण, यावेळी आशा वर्कर यांना कोरोना काळात चांगली कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.