
दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी-शिवराज पाटील
आज दि 3 मे 2022 अक्षय तृतिया मौजे रुई तालुका कंधार येथे जगतज्योतो महात्मा बसवेश्वर महारज यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.सर्व प्रथम गावातील सरपंच , पोलीसपाटील ,चेरमन,तंटामुक्ती अध्यक्ष व् गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व् नंतर रुई गावचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरका चे मुख्याध्यापक श्री मस्कले सर,ऍडव्होकेट पांडुरंग गायकवाड,हलिघोंगडे सर व् महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक श्री पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्र संचलन निरंजन महाराज गिरी यांनी केले.
या प्रसंगी डॉक्टर बसवेश्वर बोमनगे,टापरे सर, शिवा टापरे, दतत्रेय पावडे, हणमंत मस्कले, नामदेव् टापरे,बाबू दरेगावे,शिवा टोम्पे,व्यंकट मस्कले,व गावातील तरुण प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.