
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पुणे : दि ०३. महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे लोहमार्ग पोलीसांना महत्वच कामगिरी बद्दल महासंचालकांचे विशेष सेवा पदक देऊ सन्मानित करण्यात आले. यावेळी (भा. पो. से.) लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वयासे (पाटील ) यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच राष्ट्रगीताची धून वाजवून ध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी पोलीस दलातील १) सह.पो.फौ. सुरेश जाधव, २) पो. हवा. अमरदीप साळूंखे, ३) पो. हवा. जया कांबळे, ४) पो. हवा. सुधीर जगताप, ५) रमाकांत पो. हवा.रमाकांत कारले, ६) पो. ना. उदय चिले यांना विशेष सेवा पदक देऊ सन्मानित करण्यात आले. शिवाजीनगर पोलीस कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी १० पोलीस अधिकारी व ३० पोलीसांनी रक्तदान केली. याप्रसंगी अप्पर पो. अधीक्षक गणेश शिंदे, उपअधीक्षक चंद्रकांत भोसले, उपायुक्त (गुप्तवार्ता पुणे) संदीप जाधव, पो. नि. इरफान शेख, पो. नि. प्रमोद खोपीकर, विशेष शाखा पुणे संतोष पैलकर, पो. नि ( मानव संसाधन ) सुरेश गौडा, तसेच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.