
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा:-
(आमदार राजेश एकडे यांच्या वतीने जलसंधारण मंत्री यांना निवेदन सादर)
नांदुरा: दि.५ .जिगाव प्रकल्पाचे लाभ क्षेत्रापासून वंचित असलेली नांदुरा तालुक्यातील १४ गावे लाभ क्षेत्रात समाविष्ट करणे बाबत चे निवेदन मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश एकडे यांनी जयंतरावजी पाटील जलसंधारण मंत्री मंत्रालय मुंबई येथे दि.५ मे रोजी दिले….!!
या निवेदनात,जिगाव प्रकल्प,विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर,यांच्या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव गावाजवळ पूर्णा नदीवर प्रगतीपथावर आहे.या प्रकल्पामध्ये १५ उपसा सिंचन योजना असून त्याद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव,शेगाव,जळगाव जा,संग्रामपूर, मलकापूर आणी नांदुरा या ६ तालुक्यातील २६८ गावातील व अकोला जिल्ह्यातील बाळापुर आणि तेल्हारा या दोन तालुक्यातील १९ गावातील एकूण ७८,५८० हे क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित आहे,परंतु माझ्या मलकापूर विधानसभा मतदासंघांतील नांदुरा तालुक्यामध्ये हा प्रकल्प असून नांदुरा तालुक्यातील १४ गावे ही लाभ क्षेत्रा पासून वंचित आहेत,या गावांना लाभ क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात आपणाकडून संबंधितांना आदेश निर्गमित व्हावे ही विनंती असे नमुद आहे…!!