
दैनिक चालु वार्ता सिलोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड :भरधाव टेम्पोच्या धडकेत ओमनी कारमधील महिला जागीच ठार झाली शिवाय १५ प्रवाशी जखमी झाले. औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर डोंगरगाव फाट्यावर हा अपघात घडला. सुमनबाई उत्तम वानखेडे (वय ७०, रा. कन्नड) असे अपघातातील मयताचे नाव आहे. जखमींमध्ये जयाबाई किसन वानखेडे, सुनीता शामराव आळने, लक्ष्मीबाई म्हातारजी मोरे, यश विठ्ठल वानखेडे, विठ्ठल भीका वानखेडे, योगेश भीमराव बनसोडे, ठगनाबाई महादू केसापूरे, छाया विठ्ठल वानखेडे, रेखा योगेश बनसोडे, गयाबाई गणेश मोरे, गणेश सखाराम मोरे, हिराबाई बाबुराव केसापूरे, रंगुबाई लक्ष्मण मोरे, निर्मलाबाई कैलास वानखेडे, कैलास शामराव मोरे (सर्व रा. कन्नड) यांचा समावेश आहे. यापैकी हिराबाई केसापूरे, विठ्ठल वानखेडे, कैलास मोरे, योगेश बनसोडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथे रवाना करण्यात आले आहे. ओमनी कार (एमएच २० ईई ५०८४) ही प्रवाशांना घेऊन कन्नड येथून उंडणगावला चालली होती तर टेम्पो (एमएच ०४ ईबी ००३४) हा सिल्लोडकडे येत होता.