
दैनिक चालू वार्ता सिल्लोड प्रतिनिधी-सुशिल वडोदे
सिल्लोड :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग, तसेच उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड आणि जि. प. आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात भव्य मोफत आरोग्य शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात महिला गरोदर मातांची तपासणी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या गाठी, दमा, अस्थिरोग, डोळ्यांची तपासणी व उपचार, मतिमंद बालक यांचे रोगनिदान व उपचार दंतविकार, टीबी निदान अशा विविध आजाराचे जवळपास २०० रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. सदरील शिबिरामध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, अॅलोपॅथी व योगशिक्षक हजर होते. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी चाचण्या व रुग्णांना औषधोपचार देण्यात आले. आरोग्य उपसंचालक डॉ. सुनीता गोलाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, स. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, डॉ. मुंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबुराव मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नासेर पठाण, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, डॉ. मच्छिंद्र पाखरे, डॉ. नीलेश मिरकर, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख दीपाली भवर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हाजी मोहम्मद हनीफ, शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मेघा शाह, राजेंद्र ठोंबरे आदींची उपस्थिती होती.