
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा: दि.६.लोकमत समूह द्वारा दी. ४/५/ २०२२ रोजी माजी.मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, माजी आरोग्यमंत्री मा. गुलाम नबी आझाद, ऊर्जा मंत्री मा. नितीन राऊत आणि लोकमत मीडिया चे अध्यक्ष मा. विजय दर्डा यांच्या शुभ हस्ते
नांदुरा शहरातील सुप्रसिद्ध फॅमिली फिजिशियान व समाजसेवी डॉ राजेंद्र गोठी यांना
लोकमत टाइम्स एक्सलान्स इन हेल्थ केअर अवॉर्ड स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र देवून प्रदान करण्यात आला .याप्रसंगी त्यांच्या सुविद्या पत्नी डॉ.सौ.सरला गोठी सुद्धा उपस्थित होत्या.
यावेळी मुंबई येथील सुप्रसिध्द फिजिशीयन डॉ समदानी , जूरीबोर्ड चे अध्यक्ष डॉ. एस. एन. देशमुख नागपूर, पद्मश्री खासदार विकास महात्मे,पद्मश्री डॉ. अभय बंग,डॉ. राणी बंग व विदर्भातील बहुसंख्य डॉक्टर्स ,लोकमत मीडिया चे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर पुरस्कार स्वीकारताना सर्व हितचिंतक व ज्युरी बोर्डाचे डॉ. राजेंद्र गोठी यांनी आभार व्यक्त केले.यापुढे सुद्धा तळगळतील लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहील . नांदुरा शहरातील आय एम ए,डॉक्टर्स असोसिएशन ,लायन्स परिवार ,साईकृपा वैद्यकीय सेवा समिती व इतर समाजसेवी सोबत सुपर स्पेशालिटी आरोग्य शिबिरे घेण्याचा मनोदय यावेळी डॉ. राजेंद्र गोठी यांनी व्यक्त केला.
हा भव्य दिव्य सोहळा माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण असून आता समाजाप्रती जबाबदारी वाढली आहे असे डॉ.गोठी यांनी सांगितले.