
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
भोर -गेले आठ महिने भोर दुर्गाडी बस सेवा बंद आसल्या मुळे भोर तालुक्यातील भोर- दुर्गाडी दुर्गम भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून…खाजगी वाहतूक करणाऱ्या वहान चालकांन कडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे.बस सेवा बंद झाल्या मुळे विद्यार्थी वर्गा ची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे..विद्यार्थीनां शाळा,कँलेज वर वेळेत जात येत नाही..प्रवाशांना दाखावाने ,शासकीय कामासाठी तालुक्याला जण्यासाठी खाजगी वाहनातून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे. कामे वेळेत पुर्ण होत नाहीत.वाहनांची वाट तासं तास बगावी लागत आसून.नागरिकांचा संपुर्ण दिवस हा प्रवासत जात असून काम देखील वेळेत पुर्ण होत नाहीत
नागरिकांची व विद्यार्थी वर्गा ची समस्या लक्ष्यात घेऊन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अक्षय दादा किंद्रे यांनी भोर अगार व्यवस्थापकांची भेट घेऊन नागरिकांना होणाऱ्या आडचणी सांगितल्या व निवेदन देऊन बस सेवा पुर्वरत करण्याची विनंती केली