
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
पेठवडज :- पेठवडज येथील मध्यम प्रकल्प तलावाला दोन कालव्ये असून डाव्या कालव्याचे पाणी फक्त इस्टीमेंटच्या अलिकडेच म्हणजेच फक्त सहा गेटपर्यंतच जात आहे. याचे कारण अधिकारी व कर्मचारी यांनी पेठवडज येथील एक खाजगी माणूस ठेवून पेठवडज गावातील तलावाच्या जवळील शेतकर्यांना रब्बी हंगामासाठी पैसे घेऊन जेसीबीने कालवा खोदून पाईप टाकून विहीर व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो आहे. तसेच अनधिकृत मोटारी बिना परवानगी बसवून पाणी पुरवठा केलाय. डायरेक्ट विहीरीत पाईप टाकण्यात आले आहेत. मध्यम प्रकल्प विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांनी पेठवडज च्या मध्यम प्रकल्पाच्या कालव्याची पाहणी करून समोर पाणी पुरवठा कोण्या पध्दतीने सुरळीत चालू होईल याकडे लक्ष देऊन सिरसी बु. येथील शेतकर्यांना रब्बी हंगामातील पिके कसे वाचवता येतील याची खात्री करून घेवून पाण्याचे नियोजन करावे तसेच होणाऱे नुकसान वाचवावे असे शेतकर्यांनी मागणी केली आहे. अनधिकृत कलेक्शन बंद करून पुढे पाणी पुरवठा करण्यात यावा. फक्त दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात आला आहे. शेतातील पिके कडक उन्हामुळे तसेच पाणी पुरवठा नसल्याने वाळून जात आहेत. आम्ही खरीप हंगामात पेरणी कशी करावी व वर्षभर व्यवहार कसा करावा असे शेतकर्यांनी प्रशासनाला विचारले आहे. वेळीच उपाय योजना करून वरिष्ठ अधिकार्यांनी दोषी अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून योग्य ते शासन करावे असे सिरसी बु. येथील शेतकर्यांनी मागणी केली आहे. तसेच पाणी पुरवठा पुर्वी प्रमाणे शेवटच्या शेतकर्यांपर्यत कसे भेटेल याकडे लक्ष देऊन सहकार्य करावे असे शेतकर्यांनी सांगितले आहे.