
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी -राहुल रोडे
औरंगाबाद:- मराठवाड्यातील ३० ते ४० टक्के ऊस अद्याप गाळपाअभावी तसाच उभा आहे. शिल्लक ऊस कारखाना गाळप करेल याची शाश्वती नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. यासाठी शासनाने हेक्टरी दोन लाख रुपये मदत जाहीर करून तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व ऊस तोड यंत्रणेने ऊसतोडणी ज्या शेतकऱ्यांकडून एकरी दहा ते पंधरा हजार रुपये घेतले आहे. ते पैसे कारखान्यांकडून वसुल करुन शेतकऱ्यांना परत करावे. या मागणीसाठी आज सोमवार (दि. ९) रोजी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील व शेतकरी नेते विजय भैया घाडगे यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालायसमोर क्रांतीचौक औरंगाबाद येथे तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठवाड्यात ३० ते ४० टक्के ऊस शेतकऱ्यांच्या शेतात आणखी तसाच उभा आहे. शिल्लक राहीलेल्या ऊस कारखाना घेऊन जाईल याची शाश्वती नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लक्ष रुपये मदत जाहीर करुन तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. व ज्या शेतकऱ्यांकडुन कारखान्याच्या उस तोडणी यंत्रणेने एकरी दहा ते पंधरा हजार रुपये उस तोडणीसाठी अवैधरित्या घेतलेले आहेत. ते पैसे कारखान्याकडुन वसुन करून शेतकऱ्यांना परत करण्यात यावेत. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली २६५ ऊसाच्या जातीची नोंद कारखान्याने घेणे बंद केली आहे. ती नोंद घेण्यासाठी आदेशीत करावे. गेल्या तिन वर्षापासुन घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना खुलताबाद यांच्या विरोधामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने अनेक वेळा अंदोलने उपोषण करुनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई कारखान्यावर करण्यात आली नाही. तरी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करुनही तरी त्यांच्याकडे सन २०१७-१८ या वर्षाचे शेतकऱ्यांचे शिल्लक राहिलेले शंभर रुपये वसुल करुन शेतकऱ्यास देण्यात यावे. या सह उस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक ९ एप्रिल सोमवार रोजी सकाळी ११ वा. संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालायसमोर क्रांतीचौक औरंगाबाद येथे तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात भिमराव मराठे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे, यु. प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे, संघटनेचे सल्लागार भगवानदादा माकणे, प्रदेश संघटक अप्पासाहेब कुढेकर, मराठवाडा कार्याध्यक्ष संतोष जेधे यांची उपस्थिती राहणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत, शिवाजी मार्कर्डे, अशोक मोरे, जालिंदर एरंडे, किशोर सदावर्ते, प्रशांत खंडागळे, योगेश माळवदे, किशोर मगर, अभिजीत औटे, अर्जुन खराद, किरण सातपुते, ज्ञानेश्वर गांवढे, अप्पासाहेब गिरगे, सौरभ मोरे, माऊली बोंबले, अण्णा कोल्हे, अभिजीत उंदरे, नानासाहेब पाचपुते, अंकुश निकम यांनी केले आहे.