
दैनिक चालू वार्ताआर्णी प्रतिनिधी-श्री,रमेश राठोड
“”””””””””””””””””””””””””””””””””‘”””””””””””
सावळी सदोबा:-पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा परिसरातील गावांमध्ये तंटामुक्त समित्या निष्क्रिय ठरल्या आहेत, तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळालेल्या गावांमध्ये सुद्धा अवैध दारू विक्री सुरू आहे,अशा गावातील नागरिकांनी दारूविक्री बंद करण्याची मागणी केली आहे, सावळी सदोबा परिसरातील अनेक गावांना तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळालेला आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचा पुरस्कार घेतल्यानंतर आता शासन गावाचे पूर्ण मूल्यांकन करीत नसल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या आता उदासिन झाल्या आहेत,परिणामी त्यांनी अवैध दारू विक्री कडे दुर्लक्ष केले आहे, गावातील अवैध दारु विक्रीमुळे वाढणारे तंटे सोडविणे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला जड जाण्याची स्थिती पुन्हा येत आहे, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 24 नोव्हेंबर 2008 रोजी अवैध धंद्यांना प्रतिबंध घालने व त्यांचे निर्मूलन करण्यासाठी निर्णय काढला या निर्णयामुळे गावागावात अवैधद्य दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर गदा आली होती,मात्र आज रोजी गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तंटामुक्त गाव समितीच्या मागे पडले आहे, परिणामी गावात अवैद्य दारूची दुकाने आता गल्लोगल्लीत सुरू आहेत.या अवैध दारू विक्री दुकानामुळे गावाचे वातावरण दूषित होण्यास सुरुवात झाली आहे, दारुमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होताना दिसत आहे