
दैनिक चालू वार्ता फुळवल प्रतिनिधी -नर्सिंग पेठकर
अख्ख्या महाराष्ट्रात असा कार्यक्रम न भूतो न भविष्यती झाला नसेल. कंधार जिल्हा नांदेड येथील श्री शिवाजी हायस्कूल, गणपतराव मोरे विद्यालय, मनोविकास विद्यालय जिल्हा परिषद स्कूल व श्री शिवाजी जुनिअर कॉलेज कंधार येथील1994- 1996 इयत्ता बारावी मित्रमैत्रिणी मिळून ‘मित्रांगण’ हा गेट-टुगेदर चा कार्यक्रम आयोजित केला होता. हम पंछी एक डाल के हा लोगो घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं .तब्बल 28 वर्षानी एकमेकांना भेटणार ही उत्सुकता मनात घेऊन बरेच जण मुंबई, पुणे ,हैदराबाद बेंगलोर इथून मुद्दामहून कार्यक्रमाला आले होते. विशेषता मुलींची उपस्थिती ठळक दिसत होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली व त्यानंतर मृत मित्र-मैत्रिणींना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवी मुसळे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी गेट-टुगेदर ठेवण्या मागचा उद्देश व त्याचे महत्त्व विशद केले. कविता गरुडकर व सुनील कोठेकर यांनी अतिशय खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करून सर्वांचे मने जिंकली. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या व आपल्या मनातील भावना सर्वांना शेअर केली. अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम व खेळाचे कार्यक्रम हे या ठिकाणी घेण्यात आले. दुपारच्या वेळेस सर्वांनी पंचपक्वान वर ताव मारला. आइस्क्रीम कुल्फी चाही आस्वाद घेतला. दुपारच्या सत्रामध्ये अनेक मित्र-मैत्रिणी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. शालेय जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग, काही अविस्मरणीय क्षण तसेच आपल्या गुरुजनांची आठवणही यानिमित्ताने झाली आणि संपूर्ण दिवस कधी निघून गेला हेच कळालं नाही. सर्वांच्या चेहऱ्यावरील निखळ हास्य बघून मनाला अतिशय आनंद झाल्याचं सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत होतं. शेवटी भास्कर आकुलवाड यांनी आपल्या शैलीमध्ये सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाल्याचं सांगण्यात आले. जड अंतकरणाने व पाणावलेल्या नयनांनी एकमेकांचा निरोप घेऊन पुढच्या वेळेस केव्हा भेटणार अशी उत्सुकता मनात घेऊन सर्वजण आपल्या घरट्याकडे मार्गस्थ झाले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोर कमिटीतील रवींद्र मुसळे, सुनील कवठेकर, कविता गरुडकर, मीरा भांगे, डॉ. सचिन चांडोळकर , गणेश चन्नावार, भास्कर आकुलवार ,विनोद बोधगिरे या सर्वांनी सहकार्य केलं .यानंतर मित्रांगण परिवारातील सदस्यांनी आपल्याहातून काहीतरी राष्ट्रहिताच, समाजहिताचे कार्य करण्याची प्रेरणा घेऊन पुढच्या वेळेस काहीतरी नवीन उपक्रम राबवायचे ठरवले