
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा: दि.९.रेल्वे टेशन वरून नॉन स्टॉप धावणाऱ्या इत्यादी विविध महत्त्वपूर्ण मागण्याचे भुसावळ मंडळाचे अंतर्गत असणारे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा रेल्वे स्टेशन (NN) हे प्रवाशांच्या सोयीसाठी तर रेल्वेचे उत्पन्नाचे दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्षित पणामुळे सकाळी नवजीवन एक्सप्रेस व सायंकाळी महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेचे मेल, एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणे आवश्यक आहे. नांदुरा येथील 105 फूट हनुमान मूर्ती,तिरुपती बालाजी मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे.एवढेच नव्हे तर नांदुरा शहरातील वाढत्या व्यापारी धंद्याचे अनुषंगाने तथा नागपूर दवाखान्यात मुंबईस्थित शासकीय उपचार घेण्यासाठी जाणे-येणे करणाऱ्यांची मोठी संख्या नांदुरा रेल्वे स्टेशन चा वापर करीत असते असे असताना गाड्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे अनेकांना असुविधाचा सामना करावा लागत आहे. निवेदन (तथा नांदुरा रेल्वे स्टेशन वरून नॉन स्टॉप 38 रेल्वे ट्रेन ची यादी इत्यादी सह) मा. जनरल मॅनेजर, सेंट्रल मुंबई यांना पाठविले आहे.सदर निवेदनावर मा जिजाऊ विचार मंचचे संकलन अशोकराव धनोकार यांच्यासह सदस्य सर्वश्री बाळासाहेब पवार, डॉ. शरद पाटील, आनंद मुंडे, अमर पाटील, मिलिंद पाटील सर, प्रेमचंद जैन, किशोर देशमुख, कुलदीप डंबेलकर, यांच्यासह नांदुरा रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य स्वप्निल झांबड यांच्यासह अनेकांचे सहकार्य आहे.दरम्यान तब्बल दहा तास भुसावळ कडे जाण्यास व अहमदाबाद हावडा एक्सप्रेस रात्रीची दरम्यान अकोला, अमरावती कडे जाणाऱ्या ट्रेन ला थांबा नाही. रेल्वेची असे अन्याय पूर्ण नियोजन का?. असा प्रश्न आम्ही या सावित्री विचार मंच निवेदनाच्या माध्यमातून विचारत आहोत. मंगळवार 10 मे रोजी रेल्वे बोर्ड अंतर्गत पी.एस.सी. समिती नांदुरा (N N) रेल्वे प्रवाशांच्या समस्या व रेल्वे टेशन परिसराची अवलोकन करण्यासाठी येत आहेत. याप्रसंगी सदर निवेदन महा सावित्री विचार मंचाचे शिष्टमंडळाच्या वतीने पी.एस.सी. समितीला सोपविण्यात येत आहे.नांदुरा रेल्वे स्टेशन सर्व सुविधायुक्त असताना विशेषता रेल्वे प्रशासनाने गतकाळात केलेली रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्मची वाढवलेली लांबी रुंदी, नवीन लादी करण, अत्याधुनिक जिना इत्यादी अभिनंदनिय विकास कामे पूर्ण केलेली आहे. तर काही प्रगतिपथावर आहेत.असे असताना सुमारे नऊ ते दहा तास हे रेल्वे स्टेशन गाडी थांबा यापासून वंचित ठेवणे अन्याय पूर्ण आहे. जंक्शन( खानदेश) स्टेशन इथले महत्त्वपूर्ण असल्यामुळे जळगाव ते अमरावती ट्रेन दर तासाने चालविण्यात यावी! यासाठी मान्यवरांच्या स्वाक्षर्या आहेत. अशी माहिती मा जिजाऊ म्हणजे प्रसिद्ध क्रमांक जगदीश आगरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सदर निवेदनाच्या प्रतिनिधी माननीय अश्विनीकुमार रेल्वेमंत्री, रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड अध्यक्ष, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार राजेश भाऊ एकडे, माजी आमदार चैनसुख संचेती, मंडल रेल्वे प्रबंधक, भुसावळ, तसेच टीव्ही चॅनल प्रतिनिधी व पत्रकार बांधव यांना देण्यात आलेले असून वरील रेल्वे समस्या चा पाठपुरावा करून सोडवण्याची विनंती करण्यात आलेली आहे .