
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-संघरक्षित गायकवाड
मुखेड/लेंडी प्रधान आंतरराज्य प्रकल्पाच्या बाधीत गावातील प्रकल्पग्रस्तांना हरकती दाखल करण्यासाठी एक आठवड्याची मुदतवाढ अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून होत आहे.
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्प बाधीत गावातील प्रकल्प बाधीत कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. २७ एप्रिल ते ९ मे पर्यंत प्रकल्प बाधीत कुटुंबाच्या यादीवर काही आक्षेप असेल तर आपले म्हणणे तहसीलदार मुखेड यांच्या कार्यालयात लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले आहे. गेल्यावर ३५ वर्षांपासून प्रकल्प रखडल्यामुळे पुनर्वसनही रखडले आहे. घर बांधावे तर ते कायम स्वरूपाचे नाही म्हणून बाधीतांना घरे बांधता आली नाहीत. आहे त्या पडक्या घरात राहून दिवस काढत आहेत. बरेच लोक रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे, नाशिक, येथे राहत आहेत. यामुळे नऊ तारखेपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करणे लेडी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने वाढीव मुदत द्यावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने करण्यात येत आहे