
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-शासनाच्या वतीने कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा २०१७ चा उद्यान पंडित पुरस्कार तेर (उस्मानाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी रेवणसिध्द लामतुरे यांच्या पत्नी सौ. प्रभावती लामतूरे यांना जाहीर झाला.राज्यातील विविध कृषी पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली असून उद्यान पंडित पुरस्कारांसाठी नऊ जणांची निवड करण्यात आली आहे.लामतुरे यांनी आपल्या शेतात केलेले विविध प्रयोग जसे वनशेती, आंबा, मोसंबी या फळपिकांची घनपद्धतीने लागवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण, पाणलोट विकास, जलव्यवस्थापन, फळबागांना पाणी देण्यासाठी सुक्ष्म नियोजन यामुळे प्रगती झाली आहे. तसेच शेतकरी आत्महत्येची कारणे आणि उपाय म्हणजे स्वावलंबी होण्यासाठी दिलेला संदेश, आत्महत्या रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, सामाजिक क्षेत्रातील कार्य आदी कामांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी हाडोंग्री धाराशिव इको व्हीलेज ध्यान केंद्र येथे उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी सौ प्रभावती रेवणसिद्ध लामतुरे व रेवणसिद्ध लामतुरे या पती-पत्नींचा सत्कार. माजी जि. प. सदस्य बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर व त्यांच्या सहकुटुंबाच्या वतीने सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमा दरम्यान सधन शेतकरी,प्रगतशील शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे म्हणले की आधुनिक शेती ही विषमुक्त करावी. अधिकाधिक उत्पन्न हे विषमुक्त घेण्याचा प्रयत्न करावा.यासाठी मजूर मिळत नसेल तर निश्चितपणे आधुनिक यंत्राचा वापर करावा गरजेनुसार यंत्र तयार करून घ्यावी असेही आवाहन केले.यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ रामहरी मोटे,माजी तालुका कृषी अधिकारी विक्रम गाढवे ,पोलिस निरीक्षक दत्तात्रय सूर्यवंशी, बँक ऑफ महाराष्ट्र मॅनेजर ए वैद्यनाथ,अमेय पाटील,आदित्य पाटील, ग्रामसेवक निलम जानराव, तुषार तांबे, सुत्रसंचालन सुखदेव पालकर यांनी केले यांच्यासह परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती .