
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
धडगाव शहरातील सार्वजनिक शौचालय स्वच्छताचा अभाव असल्याने सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पराडके यांच्या पुढाकाराने धडगाव,वडफळ्या,रोषमाळ नगर पंचायत यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात म्हटले आहे की, वार्ड क्र.१५ मधील सार्वजनिक शौचालय हे सन २०१८ मध्ये पूर्णत्वास आले असून तेव्हापासूनच पाण्याच्या व कर्मचाऱ्याच्या अभावामुळे सदर शौचालय नागरिकांना वापरता येत नाही.सदर शौचालयाचे बाहेरून रंग रंगोटी करण्यात आलेली असून भिंतीवर शौचालय क्र.९०३१ पी ०००९ वार्ड क्र.१५ केअर टेकरचे नाव महेश रहेश वाघ केअर टेकर मोबाईल क्र.९४२०८५४८६९ असे चौकटीत लिहिलेले तसेच भिंतीवर मोठया अक्षरात त्यावर मोठया अक्षरात “एक थेंब पाण्यचा लाख मोलाचा स्वच्छ संरक्षण २०२१ तसेच एक कदम स्वछता की ओर “स्वच्छ धडगाव,सुंदर धडगाव स्वच्छ संरक्षण २०२१ असे लिहिलेली असून आत जाऊन पाहिले तर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे व मोठया प्रमाणात दुर्गंधीचा वास येत असून या ठिकाणी पाण्याचा अभावही दिसून येत आहे.त्यामुळेरोगराई पसरण्याची शक्यता आहे तेथे जवळ पास आजूबाजूस दुसरे स्वच्छता गृह नसल्याने नागरिकांची व महिला वर्गाची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.मानवता दृष्टीने नगर पंचायत धडगाव यांनी लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी विनंती वजा करण्यात आली आहे.सदर निवेदनावर शिवाजी पराडके,नवलसिंग पटले,गोस्या पाडवी,दमण्या पराडके,प्रशांत पाडवी,भगतसिंग पराडके,अनिल पावरा,दिल्या तडवी,मनीष पाडवी आदींच्या सह्या आहेत.