
दैनिक चालू वार्ता निलंगा प्रतिनिधी-राहुल रोडे
औरंगाबाद :- मराठवाड्यातील १८ ते १९ महिणे उलटुन गेली तरी शेतात उभा ऊस पडुन आहे.शेतकऱ्यांनी दाद कुणाकडे मागावी त्यामुळे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मैदानात उतरली असुन कारखानदारांनी शिल्लक राहिलेला ऊस तोडून न्यावा तसेच तोडणी पासुन वंचित असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन लाख रुपये मदत तत्काळ जाहीर करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ऊस घेऊन मंत्रालयात घुसणार इशारा अ.भा.छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी आंदोलनात राज्य सरकारला दिला.
अ.भा.छावा संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या शेतातील ऊस आपल्या हातात घेतला होता.
याप्रसंगी प्रादेशिक साखर सह संचालक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, युवा नेते विजयकुमार घाडगे,
केंद्रीय सह कार्याध्यक्ष भिमराव मराठे,
प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील,प्रदेश संघटक आप्पासाहेब कुढेकर,संतोष जेधे,डॉ.गोविंद मुळे, जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत, शिवाजी मार्कंडे,
देवकरण,नितीन पटारे,दशरथ कपाटे,राजाभाऊ वाघले यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऊस तोडून नेला हे मात्र एकीकडे गोरगरीब शेतात कष्ट करणारा राबणारा शेतकऱ्याचा ऊस तसाच उभा आहे. शेतकऱ्यांचा ऊस कारखाना घेऊन जाणार नाही त्या शेतकऱ्यांना सहकार विभागाच्या वतीने हेक्टरी दोन लाख रुपयाची मदत जाहीर करावी.
मराठवाड्यातील अनेक साखर कारखान्यांची ऊस गाळप क्षमता कमी असून ती येणाऱ्या पुढील हंगामापर्यंत जास्तीच्या क्षमतेने वाढवून देण्यात यावी.
यामुळे कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जर फरफट होत असेल तर अशा साखर कारखान्याची शेतकऱ्यांना गरज नसून छावा संघटना त्या कारखान्यांना येणाऱ्या गळित हंगामात कुलूप ठोकण्याच काम करेल.
यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक ९ एप्रिल सोमवार रोजी संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात किरण काळे पाटील,मनोज मुरदारे,राधेश्याम पवळ,गोविंद जाधव,विष्णु मोगल,मनोहर सनेर,जालिंदर एरंडे,आप्पासाहेब जाधव,अर्जुन खराद, गजानन पवार यांची उपस्थिती होती.