
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
लोहा येथुन जवळच असलेल्या मौजे कारेगाव येथे दि.10/5/1981 अनिलदादा गायकवाड यांचा जन्म झाला. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाची परिस्थीती खुप गरीब होती.व त्यांचे प्राथमिकचे शिक्षण आलेगाव (सवराते) ता.पुर्णा येथील जि.प.पा.शाळेत झाले व पुढील शिक्षण कारेगाव ता.लोहा येथे बारावी पर्यंत शिक्षण झाले व या काळातच दि.14/8/2001मध्ये त्यांचे वडील व्यंकटी कामाजी गायकवाड यांचा घरातच झोपी गेलेल्या ठीकाणी सर्पदंशाने मृत्यु झाला.व लहाण वयातच अनिलदादा गायकवाड यांचे छायाछत्र हरवले आणी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली.व त्यांच्यावर आई चऊत्राबाई,भाऊ संतोष,आजी पदमिणबाई यांची पालन पोषणाची जबाबदारी पडली.त्यावेळी त्यांची पुर्णा येथील मावशी निलाबाई हनमंते व पिंपळगाव (येवला) येथील मावशी पदमिणबाई गायकवाड व सर्वच मावसभावांनी सख्याभावा प्रमाणे ब-याचप्रमाणात मदत केली.नंतर ते गरीबीपोटी हलाखीची परिस्थीती असल्यामुळे खाण्यापिण्याचे वांदे होत असल्यामुळे आपल्या लहान भावालाही सोबत घेऊन लोहा येथील करीम शेख या गुत्तेदाराकडे 50 रुपये हजेरीने मिस्त्रीच्या हाताखाली दिवसभर काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करु लागले तेंव्हा कारेगाव येथील भारिप बहुजन महासंघाचे सदस्य कै.लक्ष्मणराव हंकारे यांनी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष बालाजी खिल्लारे यांच्याशी ओळख करुन दिली.व तेथुन राजकीय जिवनात नकळत प्रवेश झाला.व त्यांनी मिस्त्रीच्या हाताखाली काम करत – करत भारिप बहुजन महासंघाच्या शाखा खोलणे, दर आठवड्याला गावोगावी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेणे व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडविणे हे नित्यनियमाणे कामे करीत होते. याचवेळी भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.बाळासाहेब आंबेडकर यांनी अनिलदादा गायकवाड यांच्या पक्ष कार्याची व पक्ष निष्ठेची दखल घेउन औरंगाबाद येथील संत एकनाथ रंगमंदीरात भारिप बहुजन महासंघाच्या नांदेड युवा जिल्हाध्यक्षपदी निवड करुन नियुक्तीपत्र देउन सत्कार करण्यात आला.आणी नांदेड जिल्ह्यातील युवकांची जबाबदारी सोपविण्यात आली. आणी येथुनच अनिलदादा गायकवाड यांच्या अंगात नवचैतन्य निर्माण होऊन मा.खा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या उमेदीने आपल्या कार्याला सुरुवात केली.मग ते पक्ष संघटन व पक्ष बांधणीचे काम आसो की विविध आंदोलणे घाटकोपर प्रकरणी आंदोलन,खैरलांजी दलीत हत्याकांड विरोधी आंदोलन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या विरोधातील आंदोलन,दलीतांना गायराणपट्टे मिळऊन देण्यासाठी आंदोलन,जामगा शिवणी प्रकरणी आंदोलन, एन. आर.सी.कायद्याविरोधात आंदोलन ,विद्य्यार्थ्यांना विविध शैक्षणीक दाखले वेळेवर मिळऊन देण्यासाठी आंदोलन,असे अनेक आंदोलने करुन वेळप्रसंगी जेलमध्ये जाऊन समाजाला वेळोवेळी न्याय मिळऊन देण्याचे काम केले. व पक्षाचे काम करत असतांना स्वताच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वडीलोपार्जीत पडीक असलेल्या दोन एकर शेतीमध्ये उत्पन्न घेऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न मिटविला. आणी त्यांच्या कारेगाव या गावात त्यांच्या जन्माच्या अगोदर पासुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक निघत नव्हती.तेंव्हा अनिलदादा गायकवाड यांनी मा.खा.बाळासाहेब आंबेडकर,मा.आ.प्रा.जोगेंद्र कवाडे,आनंदराज आंबेडकर,यांच्या मार्गदर्शनाखाली व रमेशदादा सोनाळे,गोतम गजभारे,बालाजी खिल्लारे, बबनराव निर्मले,गंगाधर महाबळे यांच्या व सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने कारेगावात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणुक काढुन पहील्यांदाच सन.2005 मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे ठरविले असता काही गाववाल्यांनी कडाडुन विरोध केला त्यामुळे पोलिस प्रशासन गाववाल्यांचा तिव्र विरोध पाहुन जयंतीला परवानगी देत नव्हते.तेंव्हा असेच भिमजयंतीसाठी अर्जबाजारी करण्यात पाच वर्षे निघुन गेले पण पोलिसांनी परवानगी दीली नाही. म्हणुन अखेर अनिलदादा गायकवाड यांनी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांना मंत्रालया समोर स्वताला जाळुन घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा दीला त्यावेळी कारेगावच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीला सन.2010 मध्ये परवानगी भेटली व अभुतपुर्व पोलिस बंदोबस्तात पहील्यांदाच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्राची मिरवणुक कारेगावात काढण्यात आली.व तेंव्हापासुन गावातील काही जातीयवादी लोकांचे पित्त खवळले व अनिलदादा गायकवाड यांच्या घरावर रात्री बेरात्री घरावर दगडफेक करण्यात येऊ लागली.आणी तेंव्हा खैरलांजी दलीत हत्याकांडाची घटना नेमकीच घडलेली होती.तेंव्हा अनिलदादा गायकवाड यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या जिवाचे काही बरेवाईट होऊनये या भितीपोटी तत्कालीन पोलिस उपाधीक्षक श्री.कालीदास सुर्यवंशी,व तत्कालीन पोलिस निरिक्षक श्री.जी.डी.कोळेकर यांनी अनिलदादा गायकवाड यांच्या कुटुंबाचे स्थलांतर नांदेडायेथे केले.तरी काही कालावधिनंतर आॅकक्टोबर 2015 मध्ये अनिलदादा गायकवाड यांचा अपघात करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.व या अपघातात त्यांना स्वताचा एक उजवा पाय गमवावा लागला व त्यांना कायमचे अपंगत्व आले.तरी अनिलदादा गायकवाड यांनी कर्मठ व जातीयवादी लोकांना घाबरुन न जाता नव्या उमेदीने दोन्ही काखेत दोन काठ्यांचा आधार घेऊन पुन्हा गोरगरीब समाजाची सेवा करण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या लोहा तालुकाध्यक्षपदी विराजमान होऊनगगोरगरीब जनतेला न्याय मीळऊन देण्यासाठी व आंबेडकरी चळवळ नेटाने पुढे नेण्यासाठी अपंगत्वावर मात करुन डोंगराळ माळरानावर आंबेडकरी चळवळीचा मळा अनिलदादा गायकवाड यांनी फुलविला.अनिलदादा गायकवाड यांना वाढदिवसा निमित्त खुप खुप शुभेच्छा