
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनीधी-निरज तांडेल
पुणे : बँका बुडाल्या तरी ग्राहकांना त्यांच्या ठेवीवर विमा कवच मिळतं व सहकारी पतसंस्थांच्या ग्राहकांना विमा संरक्षण मिळावं यासाठी सहकार विभागानं सखोल अभ्यास करून अहवाल तयार करावा.या अहवालावर शासन सकारात्मक निर्णय घेईल. मराठा नागरी पतसंस्थेचं काम लोणंद परिसरात चांगलं सूरू आहे. ग्राहकांना डिजिटल सेवा देण्यावर भर द्यावा. पतसंस्थेची नुतन इमारत लोणंदच्या वैभवात भर घालणारी आहे. इमारतीमधील मांडणी खूप चांगल्या पध्दतीनं करण्यात आली आहे. संस्था काढणं सोपं आहे, ती चालवणं, नावारुपाला आणणं व नागरिकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणं महत्त्वाचं आहे. मराठा नागरी पतसंस्थेनं ज्यांची पत नाही त्यांना आर्थिक पुरवठा करून पत निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यवसाय सुरू झाले आहेत. कोरोना संकटाच्या काळात आरोग्य सुविधा वाढवण्यात शासन यशस्वी झालं आहे. लोणंदच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. यातून लोणंदच्या परिसराचा कायापालट करावा, असं सूचित केलं.