
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर तालुक्यातून शेकडो गोर सैनिक जाणार-विशाल पवार
देगलूर :
ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे धडकणाऱ्या गोरसेना, संघर्ष वाहीनी,प्रजा सुराज्य पक्ष,महाराष्ट्र गोपाळ समाज संघटना,अखिल भारतीय भामटा राजपूत युवक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने निघणाऱ्या मुंबई येथील आझाद मैदानावरील विराट क्रांतिकारी मोर्चात ओबीसी विमुक्त जाती च्या समाजबांधवांनी सहभाग घेण्याचे आवाहन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण यांनी केले असून गोर सेना देगलूर तालुका येथून शेकडो गोर सैनिक जाणार आल्याचे गोर सेना तालुका अध्यक्ष विशाल पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 होऊनही येथील मुलनिवासीना सर्वच क्षेत्रातील मानसन्मान, हक्क,अधिकार बराबरी देण्यात आलेले नाही. उलट आहे तेवढ्यातील हिस्सा बळकावण्याचा,कमी करण्याचा घाट घातल्या जात आहे भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजातील उभरत्या पिढीला सर्वच बाबतीत वंचित ठेवण्याचा डाव रचल्या जात आहे.
दि.११ मे रोजी आझाद मैदानावर विराट क्रांतीकारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण अबाधित राहीले पाहिजे, भटक्या विमुक्तावरील नॉनक्रिमीलिअरची अट रद्द झाली पाहिजे, चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेल्या जातवैधता प्रमाणपत्र रद्द करून असे प्रमाणपत्र देणाऱ्या व घेणाऱ्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे,जातपडताळणी कार्यालय येथे फक्त अर्ज स्विकारण्यात यावे मात्र छाननी व वितरण विभागीय कार्यालयातच करण्यात यावे.तेथे सुद्धा समितीवर मागासवर्गीय प्रवर्गातील तज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावे,सारथी व बार्टीच्या धरतीवर ओबीसी विमुक्त जाती साठी महाज्योती संस्थेमार्फत सुविधा द्याव्यात, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय भटक्या व विमुक्त जमाती विकास व कल्याण बोर्डद्वारा प्रायोजित राज्यात विमुक्त भटक्या जाती जमातीचे सर्वेक्षण व्हावे, जुनी पेन्शन योजना सर्वाना लागू करुन शासकीय व निमशासकीय कार्यालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावे,राज्याच्या अर्थसंकल्पात विमुक्त भटक्यांच्या लोकसंख्येचा प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात यावे, सत्तेवर आलेल्या सरकारने2019 ला घोषणा केल्याप्रमाणे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुलांमुलीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वस्तीगृह सुरू करावे आदी मागण्यांसाठी सदर क्रांतिकारी विराट मोर्चा निघत आहे.