
दैनिक चालू वार्ता भुम तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील आष्टा येथे भव्य कलशारोहन सोहळा होणार असून,हजारो भाविकांची गर्दी होणार आहे त्यामूळे प्रशासन सज्ज झाले आहे. आष्टा येथील ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आव्हान केले आहे की या भव्य कलशारोहन सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण केले आहे. कार्यक्रमाची रूपरेखा असे असून,दिनांक ११’१२’१३ मे वार बुधवार गुरुवार शुक्रवार या दिवशी भव्य कार्यक्रम आयोजन केले आहे.११ मे रोजी सकाळी ७.३० ते १० वा.भव्य शोभायात्रा,१० ते १ वा. येडेश्वरी मंदिर (जुने ) मूर्ती प्रनोतक्रमन आणि नवीन मूर्ती जलधिवास धान्यधिवास ,शय्याधिवास विधी,१२ मे रोजी सकाळी ७:३० ते ११ नवग्रह हवन, चंडीकादेवी महायज्ञ,१३ मे रोजी सकाळी ७:३० ते ११ वा यज्ञ सांगता, मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि श्री तुळजाभवानी माता मंदिर,श्री रेणुका माता मंदिर, श्री येडेश्र्वरी माता मंदिर,श्री विठ्ठल- बिरुदेव मंदीर कलशारोहान व नंतर महाप्रसाद आहे.रात्री ८ वाजता मान्यवरांचे आभार प्रदर्शन सोहळा होईल व नंतर महाराष्ट्राचे महागायक सुप्रसिद्ध कलाकार श्री चंदनजी कांबळे व त्यांचे सर्व सहकारी शिष्य परिवार यांचे सुमधूर देवीच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आष्टा समस्त गावकरी मंडळ यांनी केला आहे.