
दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी -आपसिंग पाडवी
समाजकल्याण सभापती रतन पाडवी यांची जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील संभाव्य भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पातळीवर भ्रष्टाचार निर्मूलन समिती गठीत करण्यात आली. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात समिती काम करणार आहे. समितीवर अशासकीय सदस्य रतन पाडवी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री अॅड. के.सी. पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सी. के. पाडवी, केवजी पाडवी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.