
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी-परतवाडा रोडवरील पथ्रोट येथे आंबेटकरी चौक रहिवासी सुधीर गंगारामजी बोबडे यांच्या घराला दि.१० मे २०२२ सकाळी ३ वाजताच्या दरम्यान आग लागल्याची माहिती प्राप्त झाली.
माहितिप्राप्तीनुसार,पथ्रोट पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ अंजनगाव सुर्जी अग्निशमन दलाला संपर्क साधला.अग्निशमन दलाचे जवानांनी सतर्कता दाखवत घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाचे लेडिंग फायरमन अरुण माकोडे,वाहनचालक आशिष कोळखरे व फायरमन गौरव इंगळे यांनी अतोनात प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले ह्यामुळे खुप मोठा अनर्थ टळला.अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले असता गावकरी मंडळींनी कौतुक केले.
आगीमध्ये कुठलीही जिवीत हानी झाली नसून आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.