
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
काही दिवसांपूर्वी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन यांचा पुष्पाराज हा सिनेमा चांगलाच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला गेला आहे या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रभराला चांगलाच वेड लावले आहे. अनेक लोकांच्या मनातून सहजासहजी बाहेर पडत आहे मात्र पुण्यांत पुष्पा चित्रपटांतील गाणे म्हणत हातवारे करणाऱ्या तरुणाला चांगलेच महागात पडले महिलेकडे बघत तो तेरी झलक शफीं हे गाणे म्हणणाऱ्या तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्वप्निल अरुण वांजळे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्निल हा वारजे माळवाडीतील रायगड कॉलनी परिसरांत राहतो मंगळवारी 9 मे दुपारच्या सुमारांस तो आपल्या परिसरांत उभा असताना तिथून फिर्यादी महिला भाजीपाला घेऊन घरी जात असताना त्याच वेळी स्वप्निलने फिर्यादी महिलेकडे बघत पुष्पा चित्रपटांतील तेरी झलक शफीं हे गाणे म्हणत हातवारे करीत हे कृत्य लज्जास्पद असल्यांने फिर्यादी महिलेने त्याला जबाब विचारला तरीही तो तिच्याकडे बघत गाणे म्हणतच राहिला अखेर महिलेने वारजे पोलिस ठाणे गाठले सदर तरुणाविरोधांत गुन्हा दाखल केला महिलेच्या तक्रारीवरुन वारजे पोलिसांनी आरोपी स्वप्नील वांजळे याच्या विरोधांत कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.