
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा प्रतिनिधी संभाजी गोसावी
सातारा जि. औंध पोलीस ठाण्यांच्या कोठडी तोडून पाच अट्टल दरोडेखोरांनी पलायन केले ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारांस घडली त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले राहुल भोसले आणि सचिन भोसले अशी दोघांची नावे आहेत तर अजय भोसले अवि सुभाष भोसले व राहुल होमराज काळे हे तिघेजण अजून सापडले नाहीत. पुसेसावळी येथे ११ जानेवारी रोजी दरोडा पडला होता यामध्ये संवाद लाखाची रोकड व २५ तोळे सोन्यांचे दागिने चोरुन नेले होते. याप्रकरणी पाचही आरोपींना न्यायालयांने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती सोमवारी मध्यरात्री तीनच्या सुमारांस सुरक्षा पथकांतील हवालदार गलांडे यांना एका आरोपीने पाणी मागितले त्यावेळी गलांडे पाणी आणण्यासाठी गेले असता पाचही आरोपींनी दरवाज्यांची कोठडी तोडली त्यानंतर पाचपैकी एक पोलीस ठाण्याच्या पुढील दरवाज्यातून तर अन्य चार जण मागील दरवाज्यांतून पळून गेले तर राज्यांचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे सध्या सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना ही घटना घडल्यांने कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया व पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्यासह पोलिस कर्मचारी औंध येथे तळ ठोकून आहेत.