
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी चंद्रपूर -प्रदिप मडावी
चंद्रपूर-
कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील 14000 हजार ग्रामपंचायत मधील राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुन्हा एकदा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत सदस्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास शिथिलता देण्यात यावी या मागणीचे दि. 14/ 2/ 2022 ला गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी यांनी निवेदन देऊन ही मागणी केली होती.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सदस्यांना अपात्र केल्यास ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर व पर्यायाने ग्रामविकासावर त्याच्या विपरीत परिणाम होणार आहे. विशेषतः त्यांच्या हक्का वर गदा येणार आहे. त्यामुळे कोविड 19 च्या प्रादुर्वभावामुळे राज्यातील तसेच चंद्रपूर जिल्हातील ग्रामपंचायत सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यात शिथिलता देण्यात यावी अशी भूमिका गोंडवाना गणतंत्र पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बापूरावजी मडावी यांनी शासन आणि प्रशासन दरबारी मांडून त्याचा पाठपुरावा केला.
विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, राजुऱ्याचे माजी आमदार सुदर्शनजी निमकर यांनी विशेष लक्ष देऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामपंचायत सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.