
दैनिक चालू वार्ता आर्णी प्रतिनिधी-श्री,रमेश राठोड
घाटांजी तालुक्यातील असलेल्या ऑल इंडिया सैनिकी स्कूल च्या राष्ट्रीय लेव्हल च्या पात्रता परीक्षेत जि.प.शाळा शरद येथील चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत महाराष्ट्र राज्यातून पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळविला. (1)सम्यक अनिल कांबळे (2)सोहम श्रीराम पराते (3)कु. समृध्दी धर्मेंद्र कांबळे (4)कु.छकूली गणेश मेश्राम. या विद्यार्थ्यांचा संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने दि.10.05.2022 ला गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी घाटंजी येथील तहसीलदार. कु.पूजा माटोडे ह्या होत्या तर प्रमुख अथीती म्हणून श्री. गजेंद्र ढवळे.श्री .सिंगेवार साहेब. सौ.वाघ मॅडम हे होते.या कार्यक्रमात जिव्हाळा कला संच चे सुप्रसिद्ध गायक सुनिल रामचंद्र चव्हाण रा.माळेगाव ता. आर्णी यांनी स्त्री व पुरूष च्या आवाजात गायन करून अक्षरशा गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले .तहसीलदार कु.पूजा माटोडे यांचे हस्ते सुनिल चव्हाण याचा शाल.श्रीफळ.व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे आयोजन श्री.गजानन डोईफोडे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. बोल्ली वार यांनी केले.आभार प्रदर्शन श्री.गजानन राऊत यांनी केले .पाहुण्यांच्या हस्ते चार ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.गुण गौरव सोहळा पाहण्यासाठी गावातील बरेच पुरूष व महीला भगीनी हजर होत्या.