
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी- बाळासाहेब सुतार
गोंदी /ओझरे तालुका इंदापूर येथील ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. कामिनी विठ्ठल खटके यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणूक सविता अंगद देशमुख यांच्या राजीनाम्याने मुळे या रिक्त जागेसाठी ही निवडणूक लागली होती.
सरपंच सौ. इंदुमती रामहरी वाघमोडे यांच्या आध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडली. तसेच निवडणुकीचे कामकाज आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी पाहिले.सदर या निवडणुकीसाठी एकही विरोध फार्म न आल्याने सौ. कामिनी खटके यांची बिनविरोध निवड विद्यमान सरपंच सौ. इंदुमती वाघमोडे यांनी जाहीर केले. या निवडी प्रसंगी सरपंच प्रतिनिधी रणजित वाघमोडे, माजी उपसरपंच अंगद देशमुख, विलास जाधव, तंटामुक्ती आध्यक्ष दिलीप हजारे, मच्छिंद्र खटके, किरण वाघमोडे, शंकर खटके, युवराज डांगे, दीपक बनसोडे, हनुमंत सुळ, आदी सर्वजण उपस्थित होते .