
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
लोहा ,कंधार तालुक्यातील लिंबोटी धरणाच्या लाभक्षेत्रातील गावनिहाय पाणी देण्याची मागणी मतदार संघातील नागरिकांनी केल्यामुळे लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी या अगोदर दि. 5 मे 2022 रोजी च्या पत्रकान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना लिंबोटी उर्ध्व मानार प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती, काल दि. 12 मे रोजी लोहा, कंधार मतदार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लिंबोटी धरणातून मतदार संघातील लाभक्षेत्रात तात्काळ पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याने आज दिनांक 13 मे रोजी शुक्रवारी उर्ध्व मानार लिंबोटी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लोहा, कंधार मतदार संघातील गाव निहाय कालवा व नाल्याद्वारे पाणी सोडण्यात येणार असल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले ,लिंबोटी धरणातील पाण्याचे ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी एकूण 4. 91 दलघमी आकस्मिक बिगर सिंचन पाणी आरक्षित केले आहे, सध्या उन्हाची प्रखर तीव्रता वाढत असल्याने लोहा ,कंधार तालुक्यातील लिंबोटी धरणाच्या लाभक्षेत्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उन्हाळी पिकांना व जनावरांना पाणी पिण्यासाठी या 6 व्या पाणी पाळीचा फायदा होणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. आज दिनांक 5 मे रोज शुक्रवारी उर्ध्व मानार लिंबोटी प्रकल्पातून लोहा, कंधार तालुक्यातील लाभ क्षेत्रातील गावांना गाव निहाय लिंबोटी धरणाची 6 वी पाणीपाळी सोडण्यात येणार असल्याचे लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष आमदार आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले.