
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
संतोष पाटील यांच्या मागणीला यश
देगलूर -: तालुक्यातील सिमावर्ती भागातील येरगी व परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने संतोष पाटील यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे पोस्ट ऑफिसची मागणी करण्यात आली होती. सदरील विषयी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याप्रकरणी वरीष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केल्याने त्याची दखल घेऊन येरगी गावाचे सर्वेक्षण करण्याबाबतचे पत्र मुख्य डाक कार्यालय नांदेड यांनी दिल्याने गावकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येरगी व परिसरातील गावातील लोकांना वेगवेगळ्या कामासाठी देगलूर येथेच यावे लागते .सध्यस्थितीत पोस्ट ऑफिस मधून बँकिंग च्या सर्व गोष्टी करता येतात. बचत खाते काढणे ,बचत करण्यासाठी पोस्टाच्या विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना फायदा होईल.त्यासाठी येरगी येथे पोस्ट ऑफिस होणे गरजेचे आहे. जेणेकरून याचा फायदा येरगी व परिसरातील ८ ते १० गावांना याचा फायदा होईल.
ग्रामीण व सिमावर्ती भागातील गावांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचा नेहमीचाच प्रयत्न राहिलेला आहे. मात्र त्या त्या भागातील समस्याची जाणीव प्रशासकीय स्तरापर्यत पोहचिण्याचे काम स्थानिक लोकप्रतिनिधीचे आहे. त्या अनुषंगाने सरपंच संतोष पाटील यांनी येरगी येथे पोस्ट ऑफिसची गरज लक्षात आणून दिल्याने व योग्य तो पाठपुरावा केल्याने त्यांच्या मागणीची दखल प्रशासनाने घेऊन सर्वेक्षण करण्याबाबत देगलूर स्थानिक पोस्ट ऑफिस (डाक घर) यांना अवगत करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याबद्दल सुचीत करण्यात आले आहे.
संतोष पाटील यांनी केलेल्या पाठपूराव्यामूळे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, मा.आ.सुभाष साबने,भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी मोलाचे सहकार्य केल्याने येरगी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.