
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
औरंगाबाद, दि. 12 घर विकण्याच्या वादावरून वडिलाने व सावत्र आईने मुलाला मारहाण केल्याची घटना सिडको परिसरात घडली. सावत्र आईने मुलाच्या पोटात चाकूने वार केला. यामुळे मुलगा • जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
साकार सुनील ढाफणे याच्या तक्रारीवरून सिडको
पोलिस ठाण्यात सुनील ढाफणे 2) सावत्र आई जया सुनील ढाफणे 3) रवि हाकाम (रा-पुंडलीकनगर औरंगाबाद) यांच्यावर सोडको पोलिस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
साकार सुनील ढाफणे (वय-24वर्षे, रा अलकानगरी हौ सोसायटी, N9 सिडको औरंगाबाद) याने पोलिसांना दिलेली माहिती अशी की, त्याच्या आईचे निधन झाल्याने वडिलांनी सन 2006 साली दुसरे लग्न केले. साकार सुनील ढाफणे व सावत्र आई जया सुनील ढाफणे व वडिल यांचेसोबत घराच्या कारणावरून नेहमी वाद होत असतात. सदर वाद हा न्यायालयात चालू आहे.
दि11/05/2022 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास साकार सुनील ढाफणे हा घरी असताना साकार सुनील ढाफणे व वडीलामध्ये भांडण झाले. वडिल म्हणत होते की मला हे घर विकायचे आहे. त्यावेळी साकार सुनील ढाफणे हा वडिलांना म्हणाला की आज दि 11/05/2022 रोजी न्यायालयाने या घरावर स्टे दिलेला आहे ते तुम्ही विकु शकत नाही व तुम्ही येथून निघून जाण्याचे आदेश केलेले आहे.
असे म्हणताच वडिलानी व सावत्र आई यानी साकार सुनील ढाफणे यास शिविगाळ करायला सुरवात केली. त्यावेळी त्यांना समजावून सांगत असताना वडिलांनी साकार सुनील ढाफणे यास हातचपाटाने माराहान केली. त्यावेळी तेथे पडलेला लोखंडी पाईप हातात घेवून उजव्या बाजुस कपाळावर वरच्या बाजुस मारला.
त्यामुळे साकार सुनील ढाफणे याच्या डोक्यातून रक्तश्राव झाले. त्याचवेळी सावत्र आईने साकार सुनील ढाफणे याच्या पोटावर उजव्या बाजुस चाकू मारून जखमी केले. हे भांडण चालू असताना -आईचा मानलेला भाउ रवि हाकाम (रा पुंडलीकनगर औरंगाबाद) याने साकार सुनील ढाफणे यास हातचापटाने माराहान केली. त्यावेळी चुलत भाऊ स्वप्नील ढाफणे याने हे भांडण सोडवले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे