
दैनिक चालु वार्ता निरा नरशिंहपुर प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेञ निरा नरसिंहपूर ( ता. इंदापूर ) येथील श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिरामध्ये सध्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवा निमित्त भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.15) श्री नृसिंहाची पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मंदिर परिसरातील चालू असलेले विकास कामांची पाहणी केली.
भीमा व नीरा या नद्यांच्या संगमावरती हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वसलेले असून, दक्षिण भारताचे काशी तर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. यावेळी श्री लक्ष्मी नृसिह देवस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्य विश्वस्त अविनाश दंडवते यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान हे कुलदैवत आहे. त्यांनी लक्ष्मी- नृसिंह तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करून निधी उपलब्ध करून दिल्याने या परिसराचा कायापालट झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. चालू वर्षी चांगला पाऊस होऊन, नागरिक-शेतकरी सुखी समाधानी राहू दे, असे साकडे लक्ष्मी-नृसिंह चरणी घातल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी नीरा नरसिंहपूर ग्रामपंचायत कार्यालयात विजय सरवदे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित, माजी सरपंच संतोष मोरे माजी सरपंच विलास ताटे, माजी सरपंच आण्णासाहेब काळे, संचालक संजय बोडके, निलेश बोडके, सदस्य नितीन सरवदे , पप्पू गोसावी, बापू जगदाळे, नाथाजी मोहिते, आदी मान्यवर उपस्थित होते.