दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि .१७. राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी नांदुरा तालुका अध्यक्ष पदी संदीप भगत यांची तर तालुका पक्ष निरीक्षक पदी गोपाळ रायपुरे यांची व इतर शुभम हेल (कार्याध्यक्ष) मुकेश वाकोडे (शहराध्यक्ष) मोसिन खान (शहर कार्याध्यक्ष) यांची नियुक्ती करण्यात आली. ह्या नियुक्त्या जयंत पाटील (पालक मंत्री )राजेंद्र शिंगणे (जिल्हाध्यक्ष) नाझेर काझी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (प्रदेश सरचिटणीस )गौरव शिंगणे (जिल्हाध्यक्ष) राहुल बापू देशमुख यांच्या मान्यतेने करण्यात आल्या. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
