दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकी मध्ये अध्यक्षपदी नीलेश बोडके तर उप अध्यक्षपदी दत्तू नरूटे यांची बिनविरोध निवड झाली इथून पुढे 2022 ते 2026-27 या वर्षाकरिता विकास सेवा सोसायटीच्या पदाचा पदभार हाती देण्यात आला.
सदर निवडणुक भारतीय जनता पार्टीच्या वतीने संचालक संजय बोडके, निलेश बोडके, राजेंद्र मगर, व तिसर्या आघाडीचे सर्वच कार्यकर्ते कल्याण बंडलकर, बाळासाहेब पडळकर, बिबीशन सूर्यवंशी, एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीची सत्ता आणली. या निवडणुकी मध्ये आध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी एकही आर्ज विरोध न आल्याने सदर निवडणूक हि बिन विरोध जाहीर झाली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष निलश बोडके बोलत आसताना म्हणाले की मला सर्वांनी भरभरून मतदान रुपी आशीर्वाद दिल्यामुळे मी कधीच आपल्या शेतकरी राजाचा विसर पडू देणार नाही आज माझ्यावर जी जबाबदारी सर्वांनी दिली त्या जबाबदारीचे योग्यरीत्या पालन करून काम करीत राहीन सोसायटीच्या माध्यमातून कर्ज प्रकरण आसो आथवा आनेक आडचणी शेतकऱ्यांच्या समजून घेऊन मार्ग काढून कामे केली जातील. नूतन चेअरमन निलश बोडके यांचे उद्गार,, निवडणुकीचे सर्व कामकाज निवडणूक अधिकारी जे.पी. गावडे. सहाय्यक निबंधक यांनी पाहिले. इथून पुढे अध्यक्ष, उपअध्यक्ष, यांनी संस्थेचा कारभार कसा करायचा याबद्दल त्यांना सविस्तर सूचना आणि माहिती देण्यात आली.
