दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
माझा मोठा मुलगा विजय यांचा फोन आला.तो म्हणाला,’बाबा आपण दोन चार दिवसांसाठी पुण्याला जावू या.’मी म्हणालो,नको बाळा मी येत नाही;पण त्याने चार जणांचे रेल्वे टिकीट बुक केलेलं होतं.मे चौदा तारखेला संध्याकाळी नांदेड पनवेल या जलद गाडीने पुणे गाठयचं होतं.विजयने सांगितले,बाबा तुम्ही आणि आई ठिक साडे चार वाजता रेल्वे स्टेशनवर या.
चौदा तारखेला आम्ही दोघं आगदी वेळेवच्या आत रेल्वे स्टेशन नांदेडला पोहचलो.गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते ते पाहिलो.गाडी तीन नंबरवर येणार होती.गाडी कोठे येणार ते बाईच्या बारीक गोड मंजूळ आवाजात हिंदी , मराठी व इंग्रजीतून स्टेशनमध्ये आवाज घुमत होतं.स्टेशनमध्ये बरीच गर्दि होती.माणसांची आवक जावक चालू होती.कोणी गप्पा मारत थांबले होते.कोणी जाहिराती पहात होते.माझा एक मुलगा व सून नोकरी निमित्याने पुण्याला राहतात.त्यांच्यासाठी काही आवश्यक थोडसं सामान सोबत घेतलो होतो.सिटचं आरक्षण होतं म्हणून काही घाई नव्हती.गाडी पुण्याला निघण्यासाठी तयार होती. तशी ती सिट्टी मारून सांगत होती.आम्ही गाडीत जावून बसलो.थोड्या वेळाने गाडी निघाली.सोबत दोन नटखट नातू होते.ते प्रथमच रेल्वेतून प्रवास करत होते.त्यांची सतत बडबड चालू होती.सिटवर उड्या मारणे चालू होते.ते कोणाचं ही ऐकण्यात त्यावेळी तरी तयार नव्हते.त्यांचा आनंद ते लुटत होते.त्यांना झोप येईपर्यंत तरी ते दंगामस्ती करणार होते.
त्या आरक्षित बोगीत आमच्याजवळ नांदेड मधील एक खान नावाचे सेवानिवृत प्राध्यापक होते.व दुसरे प्रा.आबा काळे नावाचे पंचविशीतील तरुण होते.ते पुण्याचेच रहिवाशी होते.
प्राध्यापक काळे पुण्यातच कुठल्यातरी एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत.पुण्यात ते मिसळचे हॉटेल चालवतात.तेवढ्याच ओळखीवर आगदी प्रेमाने व आग्रहाने त्यांनी आम्हाला मिसळचा अस्वाद (फुकट)घेण्यासाठी निमंत्रनही दिले.आम्ही ते निमंत्रण आगदी प्रेमाने स्विकारलो.दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या हॉटेलचा पत्ताही पाठवलां पण आम्हीच जावू शकलो नाही.ओळख प्रवासातील पण जणू जूनी ओळख असल्यासारखी वागणूक त्या तरुण प्राध्यापकाची होती.
खान साहेब तर नांदेडचेच ते आणि मी रात्रीच्या आकरा बारापर्यंत गप्पा छाटत बसलो होतो. गाडी कुठे वेग घेत होती तर मध्येच कुठेतरी दमल्या भागल्या सारखी आचके घेत होती.तर काही ठिकाणी रुसल्या फुगल्यासारखी तास अर्धातास थांबत होती. सकाळी सकाळी पुण्याच्या स्टेशनला गाडी पोहचली पण आम्ही उतरलो नाही.आम्ही उतरलो चिंचवडला.तेथून टॅक्सीने पुनावळयाला पोहचलो.जेथे माझा मुलगा विशाल भाडयाने राहतो.हा भाग स्वच्छ व निर्मळ आहे. येथे नांदेड सारखं उन मी मी म्हणत नाही.आम्ही आंघोळपाणी करून ताजेतवाने झालो. मला सोडून सर्वांचा नाष्टा चहा झाला.मी मात्र पोटभर जेवन केलो व पलंगावर थोडावेळ ताणुन दिलो.दिवसभर गप्पागोष्टी रंगल्या.उद्या करायचं तेही ठरलं . माझा छोटा मुलगा विवेक ही तेथे आला होता. सोबत माझा पुतन्या अनिल व सुनबाई संगिता ही तेथे हजर होते .
दुसरा दिवस उजाडला.कात्रज येथील सर्प उद्यान पाहायचे ठरले.सर्वच जण सकाळी लवकर उठलोत. प्रत्येकजण लवकर जावू या म्हणून पटापट तयार झाले. सकाळी बहुधा नऊ सवानऊ वाजता घरी दोन टॅक्सी कार विजय,विशाल व विवेकने बोलावून घेतले. टॅक्सी आल्या. त्यात बसून आम्ही कात्रज गाठलोत.राजीव गांधी प्राणी संग्राहलय व संशोधन केंद्र अशीच पाटी तेथे होती. तेथे तिकिटीसाठी चिक्कार गर्दी होती.विशाल तिकीटाच्या रांगेत थांबला.तेथे पाटी लावलेली होती.पाटीवर लिहीले होते…मोठ्या माणसासाठी रु ४०. ज्या मुलांची उंची ४फुट ४ इंचाच्या आत आहे त्यास रु .१० तिकीट.माझ्या दोन्ही नातूला तिकीट लागलं नाही.
आम्ही दहा जण होतो. त्यात दोन लहान होते.तिकिट मिळाले. सर्वजण प्राणी संग्राहलयात गेलो.आपणही प्राणी;पण आपण ‘शहाणे’प्राणी.मध्ये शिरल्या शिरल्या फोटो काढण्याचा कार्यक्रम दणक्यात पार पडलं.उन्ह वाढत होतं;पण ते नांदेडकर उन्हाची बरोबरी करत नव्हतं.
आम्ही सुरवातीस सर्पाच्या वेगवेगळ्या जाती पाहिल्या.अजगारासारखे मोठे सापही पाहिलोत.एका ठिकाणी थोडी जादाच गर्दी होती. माझी मुलं सूनबाई व नातू हे साप पाहाण्यात गर्क होती.जेथे जादा गर्दी होती तेथे मी केवळ उत्सुकतेपोटी गेलो. तेथे कोणताच पक्षी नव्हता की प्राणी नव्हता.तेथे फक्त एक पाटी होती .पाटीवर लिहीलं होतं: सापाचा शत्रू कोण?जमलेले सर्व लोक आगदी डोळ्याला तान देवू देवू पहात होती.काहीजण म्हणत होती आहो सापचं शत्रू मुंगूस आहे ;पण तो येथे कुठे दिसत नाही मग आहे कुठेे. उगीच काहीतरी लिहून ठेवलय चला पुढे.या बोलण्यावर मला हसू आलं. मी म्हणालो आहो सापाचं शत्रू आपण आहोत. सापाचेच नाही सर्व प्राण्याचे शत्रू मानव आहे. माझी छबी आरशात उभी असलेली मला दिसली मग मी म्हणालो, समोर बघा आरशात कोण दिसतोय?’आपणचं दिसतोत ना.तो आरशात दिसतो तो सापाचा शत्रू.मग सर्वाचं लक्ष तेथे लावलेल्या आरशाकडे गेलं व मग म्हणाले खरंच की हो आपणच आहोत शत्रू.तेथून आम्ही माकड,घार ,गिधाड , मोर असे पक्षी व प्राणी पहात पहात पुढे सरकत गेलो.
आता आम्ही आळशी अस्वल पहात होतो. पाटीवर इंग्रजीतून लिहिलं होतं (स्लोद बिअर) आळशी अस्वल पण ते काळ्या केसाचे दोन अस्वले तर नाराज होवून फेर्या मारताना दिसत होते.अस्वथ वाटत होते.चकरावर चकरा मारत होते.मला वाटलं त्यांना गुलामी नको होती.स्वतःच्या सुटकेसाठी ते प्रयत्न करत होते.
त्यापुढे हरणाचा भला मोठा कळप होतं.खाऊन पिऊन शरिराने स्थूल दिसत होते.या फुकटच्या खाण्याने त्यांनी त्यांचा चपळपणा विसरलेलं दिसत होतं.जसं लोकशाहीत मतदार राजाचं होत आहे ना तसच.सर्व कसे मरगळल्यासारखे दिसत होते. पुढे सांबराचा कळप त्यांचीही अवस्था हरणासारखीच होती. त्यापुढे गवा एका झाडाच्या थंडगार सावलीत विसावला होता.तो आपल्याच तंद्रीत दिसत होता.आजूबाजूच्या घडामोडीशी त्याला काहीही देणंघेणं नव्हतचं. हे सगळे प्राणीच पण आपआपल्या जातीचे प्रतिनिधीत्व करत होते .
येवढं सगळे पाहूण झाल्यावर आम्ही आलो जंगलाचा राजा सिंहाजवळ. एकटाच बसलेला.डोळे बंद करून .त्याच्या मनात काय मंथन चालू होतं हे कळण्यास मार्ग नव्हतं.कसं रुबाबदार होतं पण गुलाम झालेला.माझे नातू जोरजोरात ए लॉयन ए लॉयन म्हणून आवज दिले पण तो ढूंकूनही आमच्याकडे पाहिलं नाही. मलूल चेहरा घेवून राजा बसला होता.
पुढे आपला राष्ट्रीय प्राणी वाघ दिसण्यास सुंदर रुबाबदार.एका झाडाखाली विसावले होते. वाघाची जोडी होती.पण ते सुद्धा आमच्या कडे पाहिले नाहीत. नातावांनी आवज दिलं ए टायगर टायगर पण हे आवज ऐकून त्यांनी त्यांचे कान ही हलवले नाही.मोफतचं खाऊन पिऊन सुस्तावलेले होते.तेथून पुढे बिबट्या ही खाऊन पिऊन सुखी दिसले.पण त्याचंही सुख हे वरवरचंच होतं. पुढे शेकरू महाराष्ट्रचा प्राणी. जोडी होती पण एकटाचं का एकटीचं उगीच आनंदी असल्याचं भासवत होतं.
हे सगळे प्राणी पाहिल्या नंतर माझ्या मनात विचार आले.जंगलातील प्राणी आनंदाने राहणारे पण ते प्राणी संग्राहलयात आणले गेले. त्यांना खाण्यास भरपूर देत असतील;पण ते भारतातील लोकशाहीतील जणतेसारखी वाटली.जंगलाचा राजा सिंह, राष्ट्रीय प्राणी वाघ व बिबट्या हे आपला नैसर्गिक गुणधर्म विसरलेले आहेत.त्यांना आता कोणी आलं गेल्याची तमा नाही.कदाचित हे शिकार करण्याचेही विसरून गेलेले असावेत.ते जंगलात सोडल्या नंतर शिकार ही करू शकणार नाहीत करणार नाहीत. परत येतील.उपाशी मरतील. कारण ते कोण आहेत ते विसरलेले आहेत.
लोकशाहीत ही असचं काहीतरी चालू आहे . लोकशाहीच्या राजाला (मतदार) येथील राजकीय पक्ष वेगवेगळी प्रलोभणे दाखवून व त्याचं अनुनय करून त्यांना या प्राणी संग्रहालयातील प्राणी पक्ष्याप्रमाणे केलेले आहेत.
भारतात पूर्वीही गरिबी होती.आजही गरिबी आहे. पूर्वी दुष्काळ पडायचे,आजही दुष्काळ पडतात.पूर्वी मजूरदार,गोरगरिब व गरजू लोकांकडून काही काम करून घ्यायचे व त्याचा मोबदला दिला जायचा.पूर्वीचे गरिबही स्वाभिमानी होते.कोणाचं फुकट घेत नसत.चाळीस पन्नास वर्षापूर्वी शासन फुकट काही करत नसावे व वाटप करत नव्हते.महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांनी रोजगार हमी योजना काढून अनेक लोकोपयोगी कामे करून घेतली. नंतर ही योजना देशभर राबवली गेली.तांडे,वाडी,पाडे, गाव(१९७१-७२) यांना कच्च्या रस्त्याने का होईना ती जोडली गेली.आज त्याच रस्त्यावरून सध्याचं सरकार सिंमेट व डांबरच्या शाली पांघरून ते चकचकीत तकतकीत करत आहेत.
पण आजचे सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो काम न करताही मतासाठी गरिब लोकांना मोफत किंवा आगदी माफक दरात धान्य वाटप करत आहे.त्यांना आळशी बनवत आहे.सगळं मोफत मिळत असेल तर काम कोण करणार?यात शेतकऱ्यांची तर होरपळ होत आहे.शेतात मजूर मिळत नाही.शासनाने जरूर धान्य वाटप करावे पण खऱ्या खुऱ्या गरजूंना.शासन ज्यांना मोफत किंवा स्वस्त धान्य वाटप करतात ते लोक मोटार सायकलवर धान्य आणायला जातात.जवळ पंधरा विस हजाराचा मोबाईल असतो.येथे दोन रुपये किलो घेवून ते दुसऱ्या दुकानावर दहा बारा रुपये किलोने माल विकतात हे मी पाहिलेले आहे. धडधाकट लोकांकडून समाज उपयोगी काम करून घेतले पाहिजे.शासनाने जरूर गरिब लोकांना मदत करावी पण त्यांच्याकडून काही चांगले उपयोगी कामेही करून घ्यावीत.नाही तर प्राणी संग्राहलयातील जसे वाघ , सिंह,बिबटया यांनी मोफतच खाऊन स्वतःचं स्वातंत्र विसरलेले आहेत तसचं काही तरी आपल्या मतदार राजाचं होवू नये.भारतातील सर्वच राजकीय पक्षांनी विचार करून लोकशाहीच्या राजाला प्रलोभन न देता,न दाखवता स्वतःजागृत व्हावे व राजलाही मजबूत लोकशाहीसाठी जागृत ठेवावे.नाही तर मतदार राजाची आवस्थाही प्राणी संग्राहलयातील वाघ, सिंह,बिबट्या सारखीच होईल.
म्हणून म्हणतोय “मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धांगा हो.”
राठोड मोतीराम रुपसिंग
नांदेड – ६
९९२२६५२४०७ .
