दैनिक चालु वार्ता नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथेनरसिंह जयंती निमित्त यथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान यशस्वीरित्या पार पडले. नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार व आजी-माजी सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, आणि ग्रामस्थ व पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे नरसिंह जयंती निमित्त कुस्ती मैदान भरविण्यात आले. इनाम रुपये 100 पासून ते 75 हजार रुपये पर्यंतच्या निकाल कुस्त्या आकाड्यांमध्ये लावण्यात आल्या. आनेक जिल्ह्यातून कुस्ती सम्राट नामांकित शेकडो पैलवानांची हजेरी लावली.
नीरा नरसिंहपूर येथील कुस्ती मैदानामध्ये 75 हजार रुपयाची नंबर 1 ची कुस्ती पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध विष्णुपंत खोसे या कुस्तीमध्ये माऊली कोकाटेने एकेरी डावा वरती विजयी मिळवला.
तर प्रतिस्पर्धी विष्णुपंत खोसे याला हार मानावी लागली.
या आखाड्यामध्ये दोनशेहून अधिक कुस्त्या लावण्यात आल्या.कुस्ती मैदाना मध्ये पंच म्हणून पैलवान आमर जगदाळे, पै दयानंद महाडिक, पै. दत्ता मगर, पै. योगेश भोसले, पै. नितीन केचे, पै. सतीश केचे, पै. प्रशांत कोकाटे, पै. आमोल गायकवाड, यांनी काम पाहीले तर कुस्ती मैदान साठी वस्ताद म्हणन मल्लसम्राट रावसाहेब मगर मगराचे निमगाव, वस्ताद आण्णासाहेब गायकवाड, वस्ताद लक्ष्मण गावडे हे उपस्थित होते. माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते, पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, आदी मान्यवर उपस्थित होते. कुस्तीसाठी आलेल्या सर्वच मान्यवरांचा व पहिलवान यांचा सत्कार यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आला. कुस्ती मैदानाचे सूत्रसंचालन कुस्ती कॉमेंट्रीचा बादशहा म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. आसे पहिलवान युवराज केचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा कुस्ती-मल्लविद्या महासंघ यांनी काम पाहिले.
