
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
उस्मानाबाद :-शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात जागृती फौंडेशन च्या वतीने भीम-बुद्ध जयंती वार्षिक अंक 2022 चे प्रकाशन व खीरदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,जागृती फौंडेशन च्या वतीने बुद्ध जयंती दिनी भीम- बुध्द जयंती वार्षिक अंक 2022 चे प्रकाशन व पवित्र अशा खिरदाणाचा कार्यक्रम केंद्रप्रमुख अनुरथ नागटिळक, प्रा.विनय सोनवणे,प्रा.रवी सुरवसे,पवार एम.जी,संविधान ग्रुपचे अंगरखे आर.डी यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भिम- बुद्ध जयंती वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.तर या मंगल प्रसंगी सेवा निवृत्त अधिकारी,बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते खीरदान करण्यात आले.तर यावेळी भारतीय बौध्द महासभा ता.अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,वंचित बहुजन आघाडीचे जि.महासचिव-बाबासाहेब जानराव,युनूस पठाण,नागसेन शिंदे,युगप्रवर्तकचे चंद्रकांत मस्के,आरोग्य विभागाचे छञपाल वाघमारे, विजयकुमार दणाणे,सुनिल कांबळे,शशीकांत माने या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती,तर यावेळी सोमनाथ गायकवाड बाबासाहेब कांबळे मुकेश मोठे नानासाहेब भिडे प्रीतम बनसोडे सुनील माळाळे,तानाजी कांबळे,रोहित गायकवाड,अर्जुन ओव्हाळ,संघा बनसोडे,प्रभाकर सोनवणे,रोहित गायकवाड,प्रदिप गायकवाड,बाळासाहेब भोरे, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.