दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- श्री,रमेश राठोड आर्णी
सावळी सदोबा: आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा ते अकोला बाजार रस्त्यावर साखरतांडा गावासमोर अंतरगाव येथील मृतक गजानन दशरथ जाधव वय 36 वर्ष हे रत्नापूर येथील नदीवर आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या पुजेच्या कार्यक्रमा निमित्ताने गेले असतांना,घरी परत आपल्या गावाकडे जातांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला,पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून, घटनास्थळाचा पंचनामा करून,शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले,
