
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी- माधव गोटमवाड
महाराष्ट्रात महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी झाली पाहीजे या उदेशाने शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्ररा.मनोहर धोंडे यांनी विविध निवेदने व अंदोलने करुन शासनाला शासकीय जयंती करण्यास भाग पाडले.शिवा संघटनेच्या वतिने संपुर्ण महाराष्ट्रभर महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी केले जाते.दिनांक 19मे रोजी कंधार शहरात महात्मा बसवेश्वर यांची भव्य मिरणुक निघाणार असुन या मिरणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे अहवान शिवा संघटनेच्या वतिने करण्यात आले आहे.
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्यावतीने 26 एप्रिल 2001 सालापासून महाराष्ट्रामध्ये क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरी केली जाते. त्याचाच भाग म्हणून कंधार शहरात प्रतिवर्षी शिवा संघटनेच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा बसवेश्वर यांच्या 891 व्या जयंतीनिमित्त कंधार शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे..ही भव्य मिरवणूक 19मे रोजी गुरुवारी सायंकाळी ०४ वाजता ढोल ताशाच्या गजरात माईचे मंदिर कंधार येथुन निघणार संत नामदेव महाराज मंगल कार्यालय कंधार येथे सायंकाळी ०७ते १० या वेळामध्ये समारोप कार्यक्रम आयोजित केला आहे.
समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे तर उद्घाटक म्हणून वैजनाथ तोंनसुरे हे उपस्थित राहणार आहेत .प्रमुख अतिथी म्हणून संतोष पांडागळे अध्यक्ष जिल्हा उत्सव समिती, एकनाथ मोरे जिल्हा नियोजन समिती सदस्य , हरिहरराव भोसीकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस , बालाजी पांडागळे मा. सभापती पं. स. कंधार, धन्यकुमार शिवणकर राज्य सरचिटणीस शिवा संघटना , ॲड. विजयकुमार धोंडगे जि. प.सदस्य , पुरुषोत्तम धोंडगे ,मा.जि.प.सदस्य , विठ्ठलराव ताकबिडे राज्य सरचिटणीस,संजय कोठाळे मराठवाडा अध्यक्ष ,जिल्हा संपर्कप्रमुख इंजि.अनिल माळगे , मनोहर पा.भोसीकर प्रदेश सरचिटणीस किसान भारती, संभाजी बुड्ढे जिल्हाध्यक्ष शिवा संघटना, विरभद्र बसापुरे जिल्हाध्यक्ष शिवा कर्मचारी महासंघ, गणेश कुंटेवार नगरसेवक न .पा .कंधार, नंदाताई पाटील जिल्हाध्यक्ष शिवा महिला आघाडी,शुभम घोडके जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी आघाडी,हे उपस्थित राहणार आहेत. महात्मा बसेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बालाप्रसाद मानसपुरे , स्वागत अध्यक्ष शहाजी नळगे,कमिटी कार्याध्यक्ष बालाजी चुकलवाड यांची उपस्थिती राहणार आहे.तरी कंधार तालुक्यातील हजारो सर्व समाज बांधवांनी व वीरशैव -लिंगायत बंधू भगिनी यांनी मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव फसमल्ले, जी.एस.मंगनाळे, तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, त्र्यंबक भोसीकर, डी.एन.मंगनाळे,परमेश्वर डांगे, संभाजी पावडे ,माधव अभंगे, बळवंत मंगनाळे, शिवराज भोसिकर, कोंडिबा बनसोडे,बाबुराव अभंगे, गोविंद कल्याणकस्तुरे, गंगाधर किडे, परमेश्वर पोटजळे,व्यंकटी थोटे, परमेश्वर बोंबले, प्रविण मंगनाळे, राजीव नाईकवाडे ,व्होनाजी शेळगावे यांनी केले.अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे यांनी दिली.