
दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी- माधव गोटमवाड =============
भारता मध्ये अनेक समाज सुधारक झाले, ज्यानी जातीप्रथा आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कार्य केले आहेत. त्यात संत कबीर, संत तुकाराम महाराज . त्याच बरोबर महात्मा ज्योतीबा फुले, राजश्री शाहु महाराज आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न ,भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवानी हजारो वर्ष चालत आलेली जातीयेता नष्ठ करण्यासाठी अहोराञ प्रयत्न केले आहेत. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातुन सामाजिक न्यायाला अधिक म्हत्व दिले आहे. समता, स्वातंञ्य बंधुता ही तीन मुलतत्वे भारतीय राज्य घटनेत समाविष्ट केली आहेत. ज्या आधारे आपणास माणुस असल्याची जानीव होते. पण देशातील कांही राजकिय पक्ष जाती जातीत भांडणे लावण्यासाठी, जातीयेता अधिक बळकट करण्यासाठी जातवार पक्षाचा सेलच्या अध्यक्षाची नियुक्ती करीत आहेत, जातवार सेलच्या अध्यक्षाची नियुक्ती करणे म्हणजे राजकिय पक्षाचा जातीवाद नव्हे का ? असे म्हणटले तर वावगे ठरणार नाही.
भारतातील राजकिय पक्षाने जातनिहाय किवा जातवार अध्यक्ष पदाच्या करीत असलेल्या नियुक्तीमुळे देशात जातीवादाला अधिक खतपाणी घालणे हे पक्षाचे धोरण आहे की काय किंवा अशा नियुक्त्या करणे म्हणजे राजकिय पक्षाचा सुधारीत अजेंडा व सुधारीत जातीयवाद असे म्हणने चुकिचे ठरणार नाही. राजकिय पक्षासाठी ह्या नियुक्त्या योग्ये आहेत का , असे अनेक प्रश्न निर्मान होत असले तरी ते कांही असो पण याचा सरळ सरळ आर्थ म्हणजे राजकिय पक्षात , तुम्ही तुमच्या जातीचा सेलचा अध्यक्ष व्हा म्हणजे अमुक पक्षाच्या मागासवर्गीय सेलचा अध्यक्ष मागासवर्गिय कार्यकर्ता , तमुक पक्षाच्या ओबीसी सेलचा अध्यक्ष ओबीसी कार्यकर्ता, ठमुक पक्षाच्या मुस्लीम सेलचा अध्यक्ष मुस्लीम कार्यकर्ता. या जातनिहाय नियुक्तीमुळे देशात जातीयेता अधिक घट्ट होत चालली आहे. या देशातील राजकिय पक्षाला खरच भारतातुन जातीयवाद नष्ट करायचा असेल तर आशा सेलची निर्मीतीच राजकिय पक्षाने करणे चुकीचे आहे. आशा नियुत्यामुळे देशात दिवसेन दिवस रुजत असलेला जातीयवाद या सेलमुळे कमी होण्या ऐवजी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे जातीयवाद पसरवण्या मध्ये राजकिय पक्षाची भुमिका अधिक म्हत्वाची वाटते. कारण आशा नियुक्त्या करणे म्हणजे जातीय वाद घट्ट करण्यासाठी नियोजित राजकिय पक्षाने आखलेल कट आहे.किंवा नियोजित धोरन आहे. असे म्हणणे चुकिचे ठरणार नाही .
विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातुन नवसमाज व्यवस्था निर्मान व्हावी म्हणुन भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिका मध्ये प्रास्ताविका मध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवुन त्या सर्व नागरीकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय देवुन सामाजीक न्यायाची व्याप्ती वाढवुन समानता प्रधान केली आहे. पण आज राजकिय पक्षामध्ये कुठे आहे समानता राजकिय पक्षाच्या मागास वर्गीय सेलचा अध्यक्ष मागासवर्गीय कार्यकर्ता, , ओबीसी सेलचा अध्यक्ष ओबीसी कार्यकर्ता , मुस्लीम सेलचा अध्यक्ष मुस्लीम कार्यकर्ता ही आहे का समानता. राजकिय पक्षात खरी समानता आनायची असेल तर प्रत्येक राजकिय पक्षाने किमान एकवेळेस तरी राजकिय पक्षाचा बहूजन समाजातील कार्यकर्त्याला राजकिय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मागासवर्गीय कार्यकर्ता झाला पाहीजे, तेव्हा समानता दिसेल, राजकिय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसीचा झाला पाहीजे, तेव्हा समानता दिसेल , राजकिय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुस्लीम समाजाचा झाला पाहीजे, तेंव्हा समानता दिसेल आणि देशातील राजकिय पक्षाना खरी समानता आनायची आसेल तर राजकिय पक्षाचं नेतृत्व करण्याची प्रत्येक समाजाच्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे आतापर्यंत आमच्या खापर आज्या पासुन आम्ही पाहातो राजकिय राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष बाप झाला की मुलगा होतो . त्याच्या नंतर त्याचा मुलगा, त्यानंतर त्यांची मुलगी म्हणजे घरान्य शाही शिवाय दुसरा चालत नाही असेच म्हणावे लागेल.
आज देशातील प्रत्येक राजकिय पक्षानी जातवार,जातनिहाय सेलची निर्मीती करुन जातीयवाद रुजवण्याचा पयत्न अधिक अधिक करीत आहेत पण तसे न करता राजकिय पक्षानी सर्व समावेशक पक्षची बाधनी करुन पक्ष संघटेत प्रत्येक जातीच्या कार्यकर्त्याला पक्षात प्रतिनिधित्व दिले पाहीजे जातीच्या सेलचं जातवार नेतृत्व नको समानता आनन्यासाठी राजकिय पक्षानी सर्व समावेशक बहुजनाला पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी दिली पाहीजे तरच जातीयेता कमी होण्यास मदत होईल घराने शाही आणि जातवार नियुक्त्या ह्या राजकिय पक्षाला लागलेली किड आहे. ही किड दुर करण्यासाठी जातवार नियुत्या हद्दपार केल्या पाहीजे,
आशा नियुक्त्या करणे म्हणजे देशात जातीयवाद नष्ठ करण्या एवजी जातीयवाद अधिक घट्ट करण्याचे काम राजकिय पक्ष करीत आहेत असेच म्हणावे लागेल. आशा नियुक्त्या करण्या मागे मोठे शडयंञ असु शकते कारण तो मागासवर्गिय सेलचा अध्यक्ष म्हणजे त्या राजकिय पक्षातील सर्वाना कळाले पाहीजे की तो मागासवर्गिय कार्यकर्ता आहे. तो ओबीसी सेलचा अध्यक्ष म्हणजे त्या राजकिय पक्षातील सर्वाना कळाले पाहीजे तो ओबीसीचा कार्यकर्ता आहे . तो मुस्लीम सेलचा अध्यक्ष म्हणजे त्या राजकिय पक्षातील सर्वाना कळाले पाहीजे तो मुस्लीम आहे. म्हणजे तुमच्या पदावरुन तुमची जात तुम्ही सांगण्या ऐवजी त्या पक्षातील पक्ष प्रमुखाना आणि ऊच्चवर्णीय असलेल्या नेत्याना कळाली पाहीजे हाच मुख्य उद्देश या सेलचा असावा किंवा या उद्देशाने सेलची निर्मीती केली असावी असो पण हे मागासवर्गीय कार्यकर्ते ही अशा सेलचे अध्यक्ष होण्यासाठी पक्ष प्रमुखाचे उंबरवठे झिजवुन जातीचा अध्यक्ष होण्यासाठी पराकोटीचा प्रयत्न करताना अनेक कार्यकर्ते दिसत आहेत . मागासवर्गिय किंवा ओबीसी किंवा मुस्लीम सेलचा अध्यक्ष होणे म्हणजे मी या जातीचा आहे. हे जगजाहीर सांगणे होय असेच म्हणता येईल प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा अभिमान आहे. यात दुमत नाही. पण तुम्ही न सांगता तुमच्या पदावरुन तुमची जात कळते अशी व्यवस्था हे राजकिय पक्ष करीत असतील तर जातीयेता जाईल कशी असो पण मागासवर्गीय कार्यकर्ते राजकिय पक्षाच्या जातीचा सेलचा अध्यक्ष होण्यास धन्यता माणुन अध्यक्ष होतात आणि आपल्याच समाजा मध्ये दिमाखाने फिरताना आपण उघड्या डोळ्यानी पाहात आहोत निवडणुका लागल्या की ज्या जातीचा आध्यक्ष त्या जातीच्या समाजात जाणार म्हणजे तुम्ही सुध्दा जातीवाद पसरविन्यास कारनीभुत आहात. असे म्हणटले तर चुकिचे ठरणार नाही. सेलचं अध्यक्ष पद घेवुन कार्यकर्ते आज जाम खुष आहेत. अशा सेलच्या कार्यकर्त्यानी पक्ष संघटनेत भाषाणाला उभा राहीला की ज्या सेलचा अध्यक्ष आहे त्याच सेलच्या नागरीका विषयी व समाजा विषयी बोलणार व अहवान करणार त्यामुळे कार्यकर्त्याची प्रगती होण्या ऐवजी त्यांच्या मध्ये संकुचित पणाची भावना निर्माण होते. कार्यकर्ता दडपणाखाली वावरतो जातीपुर्ता मर्यादित राहातो हे कुठे तरी बदलले पाहीजे, थांबले पाहीजे, याला पुर्ण विराम दिला पाहीजे कार्यकर्त्यानी नेतृत्व करताना सर्वाचं नेतृत्व करण्याची धमक निर्मान केली पाहीजे जातीपुर्त मर्यातीत नेतृत्ववाने समाजाचा विकास होत नाही कार्यकर्त्यानी व्यापक दृष्टीकोण ठेवुन राजकारणात उतरले पाहीजे. मुळात अशा जातवार सेलची राजकिय पक्षात निर्मीतीच नको आहे. कारण अशा सेल मुळे दिवसेन दिवस जातीयवाद नष्ट होण्याऐवजी जातीय वादाची मुळे अधिक खोलवर जात आहेत. हे थांबले पाहीजे……??
पञकार प्रल्हाद दे. आगबोटे
कंधार जि. नांदेड
मो.९५६१९६३९३९