
दैनिक चालू वार्ता माळाकोळी प्रतिनिधी -गणेश वाघमारे
माळाकोळी नगरीत महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अभिवादन केले व श्रामनेर देवीदास सोनटक्के व मिलिंद म्हस्के यांच्यासह सामुदायिक वंदना त्रिशरण पंचशील ग्रहण केले व सायंकाळच्या सत्रात उपस्थित ह भ प माधव महाराज केंद्रे माळाकोळी यांनी महाकारूणी तथागत गौतम बुद्धाचे विचार विस्तारित विस्तारित पणे मांडले या समयी जयंती मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक विनोद मस्के सर उपाध्यक्ष बालाजी मस्के सुभेदार अशोक सावळे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रमणी मस्के साहेब व जयंती मंडळ सर्व सदस्य उपासक-उपासिका व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सायंकाळी कॅण्डल रॅलीमध्ये सहभागी होऊन सबका मंगल हो या आवाजात शांत अशा प्रकाशमय वातावरणात महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा जयंती साजरी करण्यात आली