
दैनिक चालु वार्ता आटपाडी प्रतिनिधी-दादासो वाक्षे
आटपाडी :-(खरसुंडी)
18 मे हा जागतिक संग्रहालय दिन आहे. प्रसिद्ध साहित्यिक ,काष्ठशिल्प कार रमेश जावीर निर्मित जावीर संग्रहालय मध्ये जागतिक संग्रहालय दिन उत्साहात संपन्न झाला .या दिनाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय सावळज तालुका तासगाव जिल्हा सांगली येथून सेवानिवृत्त झालेले माजी प्राचार्य नेवरीकर बी. एन .व इस्लामपूर काही प्रतिष्ठित नागरिक व श्री कुरणे सर यांनी सहकुटुंब सदिच्छा भेट दिली. संग्रहालयातील झाडांच्या मुळा खोडा मधील पक्षी. प्राणी, मानवी आकारातील काष्ठ शिल्प व चित्रकार सुधीर जावीर सह इतर प्रसिद्ध चित्रकारांची पेंटिंग्ज पाहून भारावून गेले. हे संग्रहालय आगळेवेगळे झाले असून याचि इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड 2021 मध्ये नोंद झाली आहे. हे संग्रहालय जगाच्या नकाशावर झळकत आहे .श्री रमेश जावीर रयत सेवक असल्या चा मला अभिमान आहे .अशी भावना प्राचार्य नेवरीकर यांनी मांडली. दरम्यान एच. एम. घाटमाथा टीव्ही युट्युब न्यूज भिवघाट तालुका खानापूर जिल्हा सांगली चे हबीब मुलानी यांनी जावीर संग्रहालयास सदिच्छा भेट दिली. संग्रहालयाचा वृत्तांत जाणून घेतला व चित्रकार सुधीर रमेश जावीर आणि काष्ठशिल्प कार रमेश जावीर यांची न्यूज बाईट घेतली. यावेळी माजी प्राचार्य नेवरी कर बी .एन .व पत्रकार हबीब मुलानी यांनी या संग्रहालयाचे संस्थापक रमेश जावीर सर यांचा सत्कार केला. यावेळी सौ सुवर्णा रमेश जावीर, सौ कविता मकरंद जावीर ,सौ क्षितिजा निखील जावीर ,श्री समाधान माने, श्री अमोल करांडे, करगणी तालुका आटपाडी जिल्हा सांगली उपस्थित होते. चहापानानंतर उपस्थितांचे श्री जावीर कुटुंबीयांनी आभार मानले..